गायन वादन नृत्य स्पर्धांचा बक्षिस समारंभ

नामवंत संस्था नंदकिशोर कल्चरल सोसायटी व नेहरू युवा केंद्र भारत सरकार यांच्या वतीने गायन वादन नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचा बक्षिस समारंभ नुकताच नंदकिशोर सभागृह निगडी येथे सम्पन्न झाला.

गायन वादन नृत्य स्पर्धेत एकूण ३५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. लहान गट (५ते ११ वर्षे), मोठा गट (१२ ते१८ वर्षे), खुला गट (१९ वर्षे व पुढे)अशा तीन वयोगटात या स्पर्धा झाल्या. परीक्षक म्हणून रेश्मा गोडांबे , वसुधा वडके, प्रशांत पवार, गौरव खंडाळकर, पंढरी दरेकर यांनी काम पाहिले. तर साथसंगत यश कांबळे, तुषार दोडे, अक्षय येंडे यांनी केली.

बक्षिस समारंभास नेहरू युवा केंद्राचे संचालक श्री यशवंत मानखेडकर, प्रसिद्ध नर्तक डॉ पं नंदकिशोर कपोते नगरसेविका सुमन पवळे, सुलभा उबाळे, सचिन चिखले, उत्तम केंदळे आदी मान्यवर उपस्थित होते

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

कथक सोलो नृत्य (लहान गट) प्रथम- दर्शना जगताप, द्वितीय- वैष्णवी कुलकर्णी, (मोठा गट) प्रथम- अदिती जगदाडे , द्वितीय – गायत्री क्षीरसावकर, (खुला गट) प्रथम – सुनीता जगदाडे कथक युगल नृत्य duet (लहान गट) प्रथम –  वैदेही काशीकर, आर्या कुलकर्णी,  (मोठा गट) प्रथम -समृद्धी मोरे, पूजा विसपुते कथक समुहनृत्य (लहान गट) प्रथम – अद्विता सुर्वे आणि ग्रुप (मोठा गट) प्रथम – झंकार नृत्य कला मंदिर

उपशास्त्रीय एकल नृत्य : (लहान गट) प्रथम – वर्णिका गौड (मोठा गट) प्रथम –  श्रावणी ठोके (खुला गट) प्रथम – चैतन्या  पाटील युगल नृत्य (लहान गट) प्रथम – नमिता कुलकर्णी, अनघा जोशी(खुला गट) प्रथम – मंजिरी भाके, शशी यादव

तबला (लहान गट) प्रथम – अनिष चौधरी (मोठा गट) प्रथम – प्रणव घोडे

शास्त्रीय गायन (लहान गट) प्रथम – यशस्वी जाधव (मोठा गट)- प्रथम हिमाली देशमुख (खुला गट) प्रथम – प्रविण कुरळकर

सुगम संगीत (लहान गट) प्रथम – तनिष्का चांदेकर (मोठा गट) प्रथम – हिमाली देशमुख (खुला गट) प्रथम- श्वेता मालोकर

हार्मोनियम वादन (मोठा गट) प्रथम – श्रिया लखापती (खुला गट) प्रथम – मृणालिनी थोरवे

सतार वादन (लहान गट) प्रथम – पार्थ क्षीरसागर (मोठा गट) प्रथम – विधी शर्मा (खुला गट) प्रथम – चारुदत्त देशपांडे

बासरीवादन (खुला गट) प्रथम – वैभव टकले

फिल्मी एकलनृत्य (लहान गट) प्रथम – तन्वी सोंडकर (मोठा गट) प्रथम – हर्षदा बांदल फिल्मी युगलनृत्य प्रथम नंदिता रॉय साक्षी शिलवंत फिल्मी समुहनृत्य (लहान गट) प्रथम – प्रज्ञा डान्स अकॅडमी (मोठा गट) प्रथम – डी मॅक्स ग्रुप (खुला गट) प्रथम – डी इ एम महिला शाळा प्री प्रायमरी

भरतनाट्यम (लहान गट) प्रथम – श्रावी कऱ्हाडकर (मोठा गट) प्रथम – अंजली जयन (खुला गट) प्रथम- कीर्ती नायर

हे स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे आतापर्यंत या स्पर्धेत ५००० च्या वर स्पर्धकांनी भाग घेतला आहे.

error: Content is protected !!