‘विज्ञानशोधिका’ आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत विखे पाटील मेमोरियल स्कूलला प्रथम क्रमांक

पुणे : भारतीय विद्याभवनच्या मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्रातर्फे आयोजित आंतरशालेय प्रश्नंजुषा स्पर्धेत विखे पाटील मेमोरियल स्कूलला प्रथम क्रमांक मिळाला. कलमाडी हायस्कूला द्वितीय, तर दिल्ली पब्लिक स्कूलच्या संघाला तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्या संघांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विखे पाटील मेमोरियल स्कूलने यंदाचा फिरता करंडक आपल्याकडे ठेवला.

प्राथमिक फेरीत एकूण 35 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातील सहा संघांनी अंतिम फेरी गाठली. गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित पाच राऊंड या स्पर्धेची अंतिम फेरी रंगली. लीप अ‍ॅण्ड स्केलचे प्रशांत जोशी यांनी या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे संयोजन केले. मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य माधुरी शाह यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी विज्ञानशोधिका केंद्राचे संचालक अनंत भिडे, उपसंचालिका नेहा निरगुडकर, भारती बक्षी, स्पर्धेच्या समन्वयिका ऋतुजा चिकाटे, भाग्यश्री लताड आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी लहानपणापासून गणित, विज्ञान सखोलपणे समजून घेत समाजाभिमुख काम करण्यावर भर द्यावा. समस्या सोडवणारे संशोधक करण्याचा प्रयत्न करावा, असे मत माधुरी शाह यांनी व्यक्त केले. अनंत भिडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. भाग्यश्री लताड यांनी सूत्रसंचालन केले. तेजस चिंबाळकर याने आभार मानले.

error: Content is protected !!