कलाकाराची प्रामाणिकता त्याच्या कलेशी असावी – सुबोध भावे 

कलाकाराची प्रामाणिकता ही त्याच्या कलेशी असावी असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे याने नुकतेच केले. सुबोध भावे यानेचित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका या तीनही माध्यमांत कामे केले असून त्याने बालगंधर्व, लोकमान्य टिळक …आणि काशिनाथ घाणेकर या चरित्रपटातील त्याच्या भूमिका आजरामर झाल्या आहेत. कॉलेजमध्ये असतांनाच सुबोध नाटके दिग्दर्शित करीत असत.

त्याने पुरुषोत्तम करंडकांत सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिळाली आहेत. पुण्यात सिल्वर समोहाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुबोधने त्याचे विचार मांडले. त्यावेळी सिल्व्हर समोहाचे किरण सावंत, संतोष बारणे, सोमनाथ सस्ते, विकास साने आणि आ. महेश दादा लांडगे हे मान्यवर उपस्थित  होते.

सुबोध पुढे असे म्हणाला की, कलाकाराने कोणत्याही चौकटीत न अडकता त्याने काम केले पाहिजे. कलेशी पक्की नाळ जोडण्यासाठी कलाकाराने रंगभूमीशी घट्ट नाते जोडणे महत्वाचे असून तेथेच कलाकार घडला जात असतो. त्याच बरोबर मराठी चित्रपटाकडे बघताना मनोरंजनात्मक दृष्टीने बघणे गरजेचे आहे. यातून काय संदेश मिळेल. यातून काय शिकायला मिळेल. यापेक्षा मनोरंजन म्हणून बघणे म्हत्वाचे आहे. ही खिलाडी वृत्ती असायला हवी.

error: Content is protected !!