श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी : योगेश काळभोर
लोणी काळभोर (वार्ताहर) : लोणी काळभोरचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी उपसरपंच योगेश प्रल्हाद काळभोर यांची तर कार्याध्यक्षपदी साधना सहकारी बँकेचे संचालक सुभाष काशिनाथ काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावातील मंदिराचा विकास, गावची यात्रा उत्तमरित्या पार पाडणे व गावातील धार्मिक कार्यक्रमांना उत्तेजन देणे हि कामे प्राधान्याने करणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश काळभोर यांनी दिली.
येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत योगेश काळभोर यांची अध्यक्षपदी, सुभाष काळभोर यांची कार्याध्यक्षपदी तर दत्तात्रय काळभोर यांची उपाध्यक्षपदी, ज्ञानेश्वर काळभोर यांची सचिवपदी, विठ्ठल काळभोर यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या ट्रस्टच्या संचालक मंडळात 35 जागा आहेत. 5 सभासद मयत असल्याने 30 जागांसाठी आज विठ्ठल मंदिरात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 30 संचालकांची निवड करण्यात आली. त्यानंतर 30 संचालकांन मधून पदाधिकारी बिनविरोध निवडण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, सुभाष काळभोर, माजी उपसरपंच प्रशांत काळभोर, पै. रामचंद्र काळभोर, सुर्यकांत काळभोर, शिवाजी काळभोर, सुभाष नरसिंग काळभोर, हरिभाऊ काळभोर, मारुती काळभोर, माऊली काळभोर, पोलीस पाटील दादासाहेब काळभोर, हेमंत गायकवाड, गणेश गायकवाड, गुलाब दुंडे आदी उपस्थित होते.
