नातं…

नातं …एव्हड्या ह्या दोन शब्दात आपलं आभाळ सामावलेल असतं, पण हे दोन शब्द कुणाशी तर जोडले जाण्यासाठी खरच पुरेशी असतात का ? नातं निर्माण करण्यापासून ते जपन्या आणि टिकविण्यासाठी कुणाकडे वेळ आहे  ..?

कारण काही नाती मर्यादित असतात, तर काही अमर्याद , काही घट्ट  , तर काही पोकळ ,काही वरवरची तर काही क्षणिक,काही मनाला भिडणारी तर काही हेवा वाटावा अशीही नाती असतात.अन तुम्ही आम्ही न कळत नेहमी नव्याच्या शोधात असतो , ते नवं काय असत तर ते असत नातं,आपल्याला अस नातं हवं असत की जे आपल्याला जोडून ठेवेल, मग फिरत राहतो आपण त्या नात्याच्या शोधात , असा शोध सुरू झाला की समजावं आपण ज्या कुणाच्या नात्यात आहोत ती नाती आपण  व्यवस्थित जपतोय .

पण नाती व्यवस्थित जपतो तरीही नव्या नात्याच्या शोधात का ? तर ती मानवी प्रवृत्ती आहे,मुळात नाती उलगडत गेली की माणसं समजू लागतात ,आणि एकदा का माणूस समजला, की नात्याच महत्व राहत नाही , कधी कधी नात्या पलीकडे माणूस समजणं हे यासाठीच अवघड होऊन जातं.मात्र प्रेमाच्या आणि मैत्रीच्या नात्यात हा अपवाद आहे ,मुळात नात्या पलीकडचा माणूस समजावा म्हणून तर प्रेम आणि मैत्रीची नाती निर्माण केली जातात .

मग अनेकांना प्रश्न पडतो नात निर्माण झालं, प्रेम झालं ,मैत्री झाली माणूसही समजला तर पुढे काय? हा प्रश्न पडणं म्हणजे त्यां नात्याचा शेवट असतो , कारण त्या पुढे ते नाती बंधनात बांधल्या जातात , जायलाही हवीत कारण नात्याला मर्यादा असतात, त्या मर्यादा संपल्या की एकतर नातं तूटत किंवा घट्ट बांधल जातं

पण हल्ली हे कुणाला नकोय,नात्यांची ऊब आलेले बरेच जण आपल्या अवती-भवती बघायला मिळतात , वय वाढलं तस  सगळी नाती उपभोगून झाल्याने त्यांना  नात्यातील ओलावा  , ओढ दिसत नाही , त्यांच्यासाठी नाती रुटीन होत जातात ,पण म्हणून काय ते नाती विसरतात अस मुळीच नसत

नात्यांच्या निर्मितीचा एक रंग ,एक उत्साह, एक सोहळा असतो  नात्याची सुरवात जशी आनंदी असते तोच आनंद घेण्यासाठी अनेकजण नवी नाती निर्माण करू पाहतात, नाती करायलाही हवी पण प्रत्येक नात्यांचा शेवट नव्या नात्यांचा शोध घ्यायला लावणार असेल तर आपलीच निर्मिती आपण माती मोल करतो अस नाही का..?

-गोविंद वाकडे

error: Content is protected !!