महाराष्ट्रातील राहुल बारहाटे याला फोक्सवॅगन ग्रुपकडून बेस्ट एप्रेंटिस पुरस्कार २०१८ प्रदान

१९ देशांमधील १६ ठिकाणांच्या ४६ तरूण टॅलेंट्सना पुरस्कार प्रदान

फोक्सवॅगनकडून सुमारे ६० व्यावसायिक अभ्यासक्रम आणि ५० दुहेरी अभ्यासक्रम यांच्यासह दरवर्षी जगातील सुमारे २०,००० तरूणांना प्रशिक्षण दिले जाते

सोनईअहमदनगर येथील २० वर्षीय राहुल बारहाटे यांची निवड फोक्सवॅगन एजीकडून वोल्फ्सबर्ग,जर्मनी येथे देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम एप्रेंटिसपैकी एक 

पुणे, ११ डिसेंबर २०१८: अवघ्या २० वर्षांच्या राहुल बारहाटेला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की,फोक्सवॅगनचा मेकॅट्रोनिक्स एप्रेंटिस प्रोग्राम त्याचे भवितव्य बदलेल आणि सुरक्षित देखील करेल. त्याला त्याच्या कामगिरीसाठी तसेच त्याने दाखवलेल्या वचनबद्धतेसाठी फोक्सवॅगन एजीच्या व्यवस्थापनाकडून वोल्फ्सबर्ग, जर्मनी येथे बेस्ट एप्रेंटिस अॅवॉर्ड प्रदान करण्यात आला तेव्हा त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी ही अभिमानाची बाब ठरली.

फोक्सवॅगन ग्रुपने आपले ‘बेस्ट एप्रेंटिस अॅवॉर्डस् २०१८’ जगभरातील सर्वोत्तम एप्रेंटिसना प्रदान केले आणि त्यांची सर्वोत्तम कामगिरी व व्यावसायिक क्षमता यांचा गौरव केला. हे पुरस्कार ७ डिसेंबर रोजी वोल्फ्सबर्ग, जर्मनी येथे प्रदान करण्यात आले. १६ अभ्यासक्रमांमधील ४६ तरूण बुद्धिमानांसाठी ही पारितोषिके फोक्सवॅगन एटेन्जेसेलशाफ्टच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. हर्बर्ट डायस, मनुष्यबळाची जबाबदारी असलेल्‍या संचालक मंडळाचे सदस्य गुन्नर किलियन आणि ग्लोबल ग्रुप वर्क्स कौन्सिलचे अध्यक्ष बर्न्ड ऑस्टेरलो यांच्या हस्ते प्रदान कऱण्यात आली.

या निमित्ताने बोलताना राहुलचे वडील म्हणाले की, ”आमच्या कुटुंबात बेस्ट एप्रेंटिसशिप अॅवॉर्ड २०१८ने गौरवण्यात येणारा राहुलसारखा मुलगा आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही फोक्सवॅगन इंडिया व फोक्सवॅगन एजी यांचेही आमच्या मुलावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि त्याला ही संधी दिल्याबद्दल आभार मानतो. एका छोट्या शहरातल्या आणि शेतीलाच आपला व्यवसाय मानलेल्या या मुलासाठी ही खूप मोठी कामगिरी आहे.”

बेस्ट एप्रेंटिस अॅवॉर्ड २०१८ मिळाल्याबद्दल राहुल म्हणाला की, ”पुणे, भारतातील फोक्सवॅगनमधील मागील चार वर्षांनी खऱ्या अर्थाने माझ्या करियरचा पाया घातला आहे. फोक्सवॅगन इंडियामधील या सर्व वर्षांमधील माझे शिक्षण आणि अनुभव यांच्यामुळे मला वैयक्तिक तसेच व्यावसायिकदृष्टया प्रगती करणे शक्य होईल, अशी मला खात्री वाटते.” तो पुढे म्हणाला की, ”मी फोक्सवॅगनचा मला ही संधी दिल्याबद्दल आभारी आहे आणि मी वचन देतो की त्यातून मी सर्वोत्तम साध्य करेन.” या विजयानंतर तो झेक रिपब्लिकमध्ये स्कोडा मुख्यालयात एक ओरिएंटेशन अभ्यासक्रम पूर्ण करेल.

तुम्हाला तुमचा अभिमान वाटलाच पाहिजे कारण तुम्ही फोक्सवॅगन समूहाचे जगातील सर्वोत्तम एप्रेंटिसपैकी आहात. भविष्यातही, आम्हाला अशा एका टीमची गरज पडेल जी प्रेरित, सक्षम आणि वचनबद्ध आहे आणि ती बदलांचेही स्वागत करते. तुम्हाला आपल्या काळातील मोठ्या आव्हानांचा सामना करायचा असेल तर तुम्ही लवचिकता दाखवली पाहिजे आणि बदल स्वीकारण्यास तयार असले पाहिजे, असे डॉ. हर्बर्ट डायेस यांनी या पुरस्कार सोहळ्यात सांगितले.

गुन्नर किलियन म्हणाले की, ”फोक्सवॅगन जगभरातील सुमारे २०,००० तरूण लोकांना जवळपास ६० अभ्यासक्रम आणि ५० दुहेरी अभ्यासक्रमात उत्तम प्रशिक्षण देते. आम्ही जगभरातील विविध ठिकाणी दुहेरी व्यावसायिक प्रशिक्षण दिले आहे आणि आमच्या उगवत्या तज्ञांना आम्ही या मॉडेलवर आधारित राहून जगभरात प्रशिक्षित करतो. यातील पुरस्कार विजेत्यांनी या प्रशिक्षणाचा सर्वोत्तम वापर केला आहे आणि एका यशस्वी करियरसाठी चांगला पाया घातला आहे. दुहेरी व्यावसायिक प्रशिक्षण वेगवान तंत्रज्ञानात्मक बदलाच्या काळात एक मोठा पाया घालत आहे, ज्यामुळे सातत्याने अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते.”

ऑस्टेरलॉह म्हणाले की, ”मी या आठवड्यात वोल्फ्सबर्गला आलेल्या फोक्सवॅगन समूहाच्या सर्वोत्तम एप्रेंटिस अॅवॉर्डसच्या विजेत्यांचे अभिनंदन करतो. तुमची उत्तम कामगिरी ही आमच्या समूहात देण्यात येणाऱ्या उच्च कामगिरी व्यावसायिक प्रशिक्षणाचाही परिपाक आहे. हे यश आम्हाला हे दाखवते की, आम्ही व्यावसायिक प्रशिक्षणाबाबत कोणत्याही स्वरूपाचे त्याग सध्याच्या परिस्थितीत करू नयेत. व्यावसायिक प्रशिक्षणामुळे भविष्यातील तज्ञांची निर्मिती होते. ही डिजिटल काळाच्या युगात बदलाला आकार देण्यासाठीची गरज आहे आणि त्यासोबत विकास, उत्पादन व मोबिलिटी यांच्यासाठीही गरजेचे आहे.”

यावर्षीचा बेस्ट एप्रेंटिस अॅवॉर्ड फोक्‍सवॅगन एजीद्वारे प्रदान करण्‍यात आलेल्‍या अशाप्रकारचा १८वा पुरस्‍कार होता. २००१मध्‍ये एकूण ५२३ एप्रेंटिसना हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला आहे. एकूण १८ पुरस्कारविजेत्यांचा गौरव त्यांच्या कंपन्यांप्रति त्यांच्या वचनबद्धतेसाठी आणि प्रशिक्षण अभ्यासक्रमातील ज्ञान व कौशल्यासाठी करण्यात आला आहे. एकूण २१ सर्वोत्तम एप्रेंटिस अॅवॉर्ड विजेते पदवी अभ्यासक्रम शिकणार असून आपली कौशल्ये आणि ज्ञान यांचा विकास करणार आहेत. जर्मनीतील तीन पुरस्कार विजेत्यांना आपल्या व्यावसायिक कुटुंबात दोन वर्षांचे व्यावसायिक पाठबळ ‘टॅलेंट ग्रुप फॉर यंग स्पेशालिस्ट’ या विभागात मिळणार आहे.

error: Content is protected !!