पार्थ जोशी ‘कोंदण खोज हिरे की’  पुरस्काराचा मानकरी

बालकलाकार पार्थ जोशी ‘कोंदण खोज हिरे की’ या कार्यक्रमात ‘शो स्टॉपर’ म्हणून सहभागी झाला होता. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांची त्याने मने जिंकली. ‘मिस आणि मिस्टर ब्यूटी स्टार २०१९’ या स्पर्धेचे आयोजन भीमसेन जोशी, सभागृह या ठिकाणी नुकतेच करण्यात आले होते. या वेळी मुख्य पाहुणे म्हणून या कार्यक्रमला आ. लक्ष्मण जगताप, शिवाजी साळुंखे, विशाल येवले, चेतन धोत्रे, प्रशांत गांधी स्मेता इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

पार्थ या स्पर्धेसाठी चीनहून आला होता. पार्थ हा उजेन मध्य प्रदेश या ठिकाणीचा असून तो मराठी आहे. वडिलांच्या व्यवसायामुळे तो सध्या चीनमध्ये वास्तवास असून तो मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या अभिनय करतोय. आगामी काळात त्याचा एक मराठी आणि एक हिंदी असे दोन चित्रपट आहेत. त्या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत आपणास तो दिसेल.

एवढ्या लहान वयात त्याने जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात ठसा उमठवला आहे. चीनमध्ये ही या मराठी कलाकाराचे कौतुंक होत असून सध्या तो त्याच्या जन्मभूमी आणि मातृभाषाकडे तो वळला असून लवकरच तो मराठी चित्रपटात काम करताना आपणाला तो दिसेल. चीनमध्ये राहून मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा केलेला प्रचार आणि प्रसार या बद्ल त्याला हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आले.

error: Content is protected !!