सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागातर्फे सिनेसोफिया फिल्म फेस्टिवलचे आयोजन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागातर्फे सिनेसोफिया फिल्म फेस्टिवलचे १३ मार्च २०१९ रोजी  आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापीठाच्या तत्वज्ञान विभागातर्फे सिनेसोफिया फिल्म फेस्टिवलचे  १३ मार्च २०१९ रोजी  आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती तत्वज्ञान विभागाचे विभागप्रमुख प्रा. रवींद्र मुळे यांनी दिली. या सिनेसोहिया फिल्म फेस्टिवलचे उदघाटन सकाळी १०.३० वा .फिल्म अँड टेलिव्हीजनचे पर. देब कमल गांगुली यांचा हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान ागातर्फेफुले होणार आहे. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे माजी विभागप्रमुख राज राव, तत्वज्ञान विभागाचे विभागप्रमुख प्रा. रवींद्र मुळे, प्रा. कारिलेमला प्रा. डॉ. हरीश नवले, डॉ. श्रीधर आकाशकर, प्रा. मुजफ्फर मल्ला, प्रा. आशिष सांगळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या फिल्म फेस्टिवलमध्ये सकाळी ११ वाजता साऊथ कोरियाच्या  ली चांग-डाँग या दिग्दर्शकाचा बर्निंग हा चित्रपट, दुपारी २ वाजता अमेरिकेच्या (यू एस ये) वर्नर हरझॉग या दिग्दर्शकाचा लो अँड बेहोल्ड रेवरिझ ऑफ द कनेक्टेड वर्ल्ड हा चित्रपट, सायंकाळी  ४ वाजता जर्मनीच्या डॉरीस डॉरी  या दिग्दर्शकाचा  चेरी ब्लॉझम हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. प्रत्येक चित्रपटानंतर  प्रा. देब कमल गांगुली,  प्रा. राजा राव  दर. डॉ. करिलेमला विश्लेषण करणार आहेत. तत्वज्ञान व सामाजिक विषयावरील चित्रपटांची जाणीव व्हावी व चित्रपट हे तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून समजून घ्यावे त्यासाठीच पहिल्यांदाच अशा प्रकारच्या फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सिनेसोफिया फिल्म फेस्टिवल मध्ये जास्तीत जास्त सिनेप्रेमी, चित्रपट अभ्यासक व विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन या सिनेसोफिया फिल्म फेस्टिवलचे समन्वयक प्रा. डॉ. करिलेमला, इरांदा महागा मागे, एरिक टोमासीनि, प्रशांत निकम, कल्पेश मोरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!