विद्युत मिटरच्या स्पार्कींगने दुरचित्रवाणीचा स्फोट

आष्टी । संतोष तागडे : घरातील विद्युत मिटरमध्ये स्पार्कींग झाल्याने दुरचित्रवाणीचा स्फोट होवुन घराला आग लागून हजारो रुपयाचे नुकसान झाल्याची घटना तालुक्यातील क-हेवडगाव येथे घडली दि.02 फेब्रुवारी रोजी क-हेवडगाव येथील पोपट बळीराम गायकवाड यांच्या राहत्या घरी रात्री 8.30 सुमारास गायकवाउ कुटूंब अंगणामध्ये जेवण करत असतांना अचानक विद्युतमिटर मध्ये स्पार्कींग झाल्याने विद्युत मिटर जवळ असलेल्या दुरचित्रवाणीचा मोठा स्फोट झाला घरामध्ये अग्नीतांडव होवुन घरातील संसारउपयोगी वस्तु,कपडे, मिक्सर, फॅन यासह लोखंडी कपाट व त्यामध्ये असलेली रोख 16 हजार रुपयाची रक्कम ही जागीच जळून खाक झाली.

गायकवाड कुटूंब हे मोलमजुरी करुन कुटूंबीयांची उपजिवीका भागवतात.  विषेशत: दुष्काळी परिस्थीती हाताला काम नसल्याने कुटूंबावर अर्थीक संकट ओढावले होते मुलाच्या शिक्षणासाठी पोपट गायकवाड यांनी दोन दिवसापुर्वीच येथिल बंधन बँकेडून ही रक्कम कर्जाऊ घेतली होती. स्फोट एवढा भयानक होता की, आवाजाने शेजारील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेवुन विद्युत पुरवठा खंडीत करुन आग विझवली सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. या घटनेचा गाव कामगार तलाठी, महावितरणाचे अधिकारी यांनी पंचनामा केला असुन 30 हजाराची नुकसान झाल्याचे नमुद केले आहे. गायकवाड कुटूंबीयांना नुकसान भरपाई मिळावी असी मागणी क-हेवडगाव येथील नागरीकांनी केली आहे.

error: Content is protected !!