महाराष्ट्रात काँग्रेस १० वी नापास ?

१९६० साली राज्य निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्रात गेल्या ५८ वर्षात जवळपास ४८ वर्षे काँग्रेसचे किंवा काँग्रेस संबंधित पक्षाचे (उदा. पुलोद) सरकार राहिले आहे. १९९४-९९ मध्ये मनोहर जोशी व नारायण राणे हे युती सरकारातील सेनेचे मुख्यमंत्री झाले, तर आता २०१५-२० मध्ये भाजपा चे देवेंद्र फडणवीस हेही युतीचेच- पण लडखडत्या चालीच्या- मुख्यमंत्री आहेत.

या दोन सरकारांच्या मधील १५ वर्षाचा काळ हा एकहाती काँग्रेस (आघाडी) पक्षाची सत्ता महाराष्ट्राने अनुभवली.

देश पातळीवरही १९४७ ते २०१८ या सत्तर वर्षात , मोरारजी, बाजपेयी व सध्याचे मोदी सरकारची १२ वर्षे सोडल्यास जवळपास साठ वर्षे काँग्रेसने व काँग्रेस संबंधित (विश्वनाथ प्रताप सिंग, गुजराल, देवेगौडा, चंद्रशेखर…)आघाड्यानीच राज्य केले. या साठ वर्षाचा लेखा-जोखा कोणती माध्यमे , व कधी; सचोटीने आणि स्पष्टपणे मांडतील त्या सुदिनाची आपल्याला  किती वाट पाहावी लागणार ते काळच जाणे.

पण १९९९-२२०१४ या १५ वर्षात महाराष्ट्र ज्या सरकारांच्या हातात होता(विलासराव, अशोकजी, आणि पृथ्वीराज बाबा) त्यांनी काय केले हे आता जनतेला कळू लागले आहे.

विचार करा, १९९९साली महाराष्ट्रात जन्मलेले मूल २०१४ साली १० वी यत्ता पास होऊन व्यावसायिक शिक्षणाकडे, किंवा कौशल्य-अभ्यासक्रमाकडे, किंवा विद्यापीठ शिक्षणाकडे जायला हवे होते ना ?

आणि मग २०१४ नंतरचा महाराष्ट्र हा केरळ प्रमाणेच १००% साक्षरतेच्या जवळपास पोचायला हवा होता. या १५ पैकी १० वर्षात (म्हणजे मूल शाळेत जाऊ लागताच) महाराष्ट्र व केंद्रात समविचारी सरकारे होती. सर्व प्रकारच्या कायदेशीर तरतुदी, सवलती, नियम, प्रशासन सारे काही जय्यत तयार होते , कोणताही अडथळा नव्हता.

मग एवढे असूनही पुढच्या १० वर्षात या मुलाला; हे सरकार १० वी पास होण्यात मदत व मार्गदर्शन का करू शकले नाही याचा विचार होणे गरजेचे आहे.

असे झाले असते तर महाराष्ट्र १०० टक्के साक्षर व सुशिक्षित झाला नसता का ? सर्व जनता मुख्य प्रवाहात आली नसती का ? बरेच प्रश्न कमी झाले नसते का ? मग हे न होण्याचे कारण काय असावे ? राज्यकर्त्यांना दूरदृष्टी नव्हती, की ठोस कार्यक्रम नव्हता, की दुसरे काही मनात होते, की निःस्वार्थीपणा चा आभास होता, की जनहिताच्या कार्यक्रमांना प्राथमिकता नव्हती, की  सर्व मिळून कोण्या वेगळ्याच आयोजनात मग्न होते ?

परिणाम इतकाच झाला की १५ वर्षातील एकहाती सत्ता असूनही सरकार १० वी नापास झालं आहे हेच जनतेच्या मनात पक्के बसू लागले आहे.

जनता निर्णय घेईलच आता…!

प्रमोद द बापट, पुणे-९ :  ९८२३२७७४३९

error: Content is protected !!