फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल स्कॉलरशिपच्या निकालांची घोषणा 

मुंबई12 फेब्रुवारी, 2019: फेडरल बँकेने सामाजिक समस्यांमध्ये भरपूर लक्ष घालून बँकेच्या स्थापनेपासूनच हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. शाश्वत पर्यावरण, गरीबी उन्मूलन, शिक्षण आणि कौशल्य विकास, सशस्त्र दलातील माजी सैनिकांना लाभ, क्रीडा प्रसार, ग्रामीण आणि वस्ती विकास अशा विविध उपक्रमांना बँकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यांचे व्यवस्थापन करण्यात येते. बँकेतर्फे राबवण्यात येणारा असाच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे स्पीक फॉर इंडिया. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्यांमध्ये दरवर्षी राज्यस्तरीय चर्चात्मक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

फेडरल बँकेच्या वतीने केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील एमबीबीएस, इंजिनिअरींग, बीएससी नर्सिंग आणि बीएससी अॅग्रीकल्चर, बीएससी (हॉनर्स) को-ऑपरेशन आणि बँकिंग विथ अॅग्रीकल्चर सायन्सेस क्षेत्रात करीयर करू पाहणाऱ्या इच्छुक गुणवंत विद्यार्थ्यांकडून फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन स्कॉलरशिपकरिता वर्ष 2018-19 साठी अर्ज मागविण्यात आले होते. वर्ष 2018-19 करिता 100 विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्तीसाठी झाली असून निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी बँकेची वेबसाईट https://www.federalbank.co.in/el/corporate-social-responsibility वर देण्यात आली आहे.

· केरळमधील 62 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली

· महाराष्ट्रातील 15 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली

· गुजरात राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली

· तामिळनाडूमधील 12 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली

· विद्यार्थ्यांची निवड शारीरिकदृष्ट्या दिव्यांग वर्गवारीत झाली.

राज्य शाखा लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या
केरळ बी. एससी – नर्सिंग 20
इंजिनिअरिंग 6
एमबीबीएस 16
बी. एससी – अॅग्रीकल्चर 7
एमबीए 13
महाराष्ट्र  इंजिनिअरिंग 5
एमबीबीएस 3
बी. एससी  – अॅग्रीकल्चर  2
एमबीए 5
गुजरात  इंजिनिअरिंग 4
बी. एससी  – अॅग्रीकल्चर 5
तामिळनाडू  इंजिनिअरिंग 5
बी. एससी  – अॅग्रीकल्चर 5
एमबीए 2
दिव्यांग (शारीरिकदृष्ट्या) 2
error: Content is protected !!