घुसखोरांचा पुळका, आणि भाजपचा तिटकारा का?

गुरुवार दिनांक ०७-०२-२०१९ रोजी लोकसभा वाहिनीचे लाईव्ह प्रक्षेपण पाहत होतो.  बहुधा पंतप्रधान श्री. मोदीजीही काही वेळ उपस्थित होते. प्रश्न करा. ६५-६६ चालू होते.

आकाशवाणी (श्री राज्यवर्धन राठोडजी ) आणि रस्ते-जल वाहतूक (श्री गडकरीजी) यासंबंधी प्रश्न आणि उप-प्रश्न यांवरुन खूप नवीन माहिती मिळाली. दिल्ली/गुरुग्राम-मुंबई हा नवीन रस्ता राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या अविकसित भागाचा विकास होण्यास नक्की उपयुक्त होईल असे कळले. गम्मत अशी की विरोधी बाकांवरील उपस्थिती कमी वाटली. कोंग्रेसचे श्री. खरगे दिसले, पण राहुल गांधी आणि त्यांचे जवळचे सहकारी नेहमीच्या जागी दिसले नाहीत.

यानंतर सुरू झालेल्या लोकविशेष विषयावरील चर्चेतही राहुल , सोनिया आदि दिसले नाहीत. मात्र या चर्चेत विविध पक्षातील खासदार आपआपल्या मतदार क्षेत्रात्तील, किंवा इतर लोकोपयोगी (उदा. कर्करोगाचे पसरते रूप, आणि उपाय-योजना) विषयांवर बोलत होते. गरिबांसाठी लढणार्‍या राहुल-सोनिया वगैरेंना हे आणि असे विषय महत्वाचे वाटत नाहीत का ?

अनुपस्थित सभासदांना पगार/भत्ते का देण्यात यावेत असा प्रश्न मनात येतो. आहे का उत्तर ?

यानंतर कोंग्रेसचे आसाम मधील खासदार श्री विवेक गोगोई यांनी आसाम, आणि इतर पूर्वांचल राज्यातील मूल भारतीय नागरिक शोधून काढण्या संबंधीच्या केंद्र सरकारच्या कारवाईवर मत प्रदर्शन केले.  आसाम, अरुणाचल, मेघालय, मिजोरम, मणीपुर, त्रिपुरा, नागालँड अशा राज्यातील घुसखोरीबद्दल वेळीच कारवाई न केल्याबद्दल खरे तर कोंग्रेसने  देशाची माफी मागितली पाहिजे. उलट देशाच्या अर्थ आणि सुरक्षा व्यवस्थेवर ताण देणार्‍या या घुसखोरीवर उपाय योजणार्‍या मोदी सरकारवरच ही मंडळी तोंडसुख घेत आहेत. रोहिङ्ग्या घुसखोर हा असाच आणखी एक विषय.    १९४७ नंतर देशात घुसलेल्या या घुसखोरांशी कोंग्रेस आणि मित्रपक्षांचे काय हितसंबंध असावेत ?

जे मूळ भारतीय नाहीत त्यांना स्वदेशी परत पाठविण्याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नसावे. पण देशातील काही राजकीय पक्ष त्याचेही राजकारण करू पाहत आहेत याचे आश्चर्य वाटते.

आणि वर हीच राजकीय-पक्ष—भेळ भाजप पक्षाला मात्र “स्वातंत्र्य चळवळीत कोठे होतात?” असा उर्मट प्रश्न विचारताना काहीही शरम बाळगत नाही ! संघ आज ९० वर्षे पूर्ण करीत आहे विसरलात काय ? मोदी-विरोधी संधीसाधू राजकीय भेळीतील किती पक्ष स्वातंत्र्य चळवळीत होते ? सांगाल का ?

प्रमोद बापट, पुणे

९८२३२७७४३९

error: Content is protected !!