अजित वाडेकरांना अमूलने वाहिली वेगळ्या पद्धतीने आदरांजली

अमूल कंपनी आपल्या वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी खूप प्रसिद्ध आणि विश्वसनीय आहे.  त्याचबरोबर ही कंपनी त्यांच्या आगळ्यावेगळ्या जाहिरातींसाठी देखील प्रसिद्ध आहे. देशात चालू असलेल्या सर्व  गोष्टींकडे त्यांचे बारीक लक्ष असते. बुधवार, १५ ऑगस्ट रोजी  अजित वाडेकर या माजी भारतीय क्रिकेट कर्णधाराचे निधन झाले. यावर देखील अमूलने जाहिरातीच्या रूपाने त्यांना आदरांजली वाहिली.

अमूलने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर एक पोस्टर शेअर केले.  त्यात त्यांच्या जाहिरातीमध्ये असणारे नेहमीचेच  कार्टून कॅरेकटर्स  होते. त्यातील मुलगा अजित वाडेकर यांच्या डावखुऱ्या शैलीत फटका  मारताना दिसत आहे. त्यांची टॅगलाईन देखील खूप रोचक आहे.  त्यावर ‘हमारे अजित कप्तान’ असे लिहले होते. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली  भारतीय कसोटी संघ इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर  आपली पहिली मालिका जिंकला होता.

या पोस्टरच्या खालच्या बाजूला त्यांनी ‘जित्या वाडेकर ( १९४१-२०१८) असा त्यांचा कालखंड लिहला आहे.  वाडेकर हे मुंबई येथील होते आणि तिथे त्यांना ‘जित्या’ म्हणूनच संबोधले जायचे. त्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्ट नेमकेपणाने या पोस्टरमध्ये लिहली असून या पोस्टर द्वारे त्यांना अभिवादन करण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे त्यांचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!