राजकारणातून ‘दमलेला बाबा’ खेळण्यांच्या दुकानात जातो तेव्हा…

310

मुंबई : धकाधकीच्या कामांतून उसंत मिळाल्यावर ‘बाबा’ म्हणा किंवा ‘बाप माणूस’ म्हणा, त्यांना ओढ असते ती म्हणजे आपल्या कुटुंबाची. आपल्या वाटेकडे डोळा लावून बसलेल्या लेकरांची. आता काही कारणाने बाबांना घरी येण्यास उशीर झाला तर या मुलांचा रुसवा तर असणारच. हाच रुसवा दूर करण्यासाठी आणि मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सक्रिय असणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार Rohit Rajendra Pawar यांनी एक शक्कल लढवली आहे.

फेसबुकवर काही फोटो पोस्ट करत त्यांनी आपल्या मुलांसाठी केलेल्या खास खरेदीविषयी माहिती देत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्यांच्यातील नेत्यासोबतच एका वडिलाच्याची मनातील भावना दाटून आल्याचं स्पष्ट होत आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून राजकारणआत सुरु असणाऱ्या घडामोडी पाहता एक य़ुवा नेता म्हणून हे सारंकाही आपल्याला अनेक अनुभव देणाऱ्या ठरल्या, असं सांगत अधिवेशन संपवून जेव्हा आमदार विश्वजित कदम यांच्या कारने रोहित पवार त्यांच्यासोबतच निघाले, तेव्हाच त्यांच्या नजरेस रस्त्याच्या कडेला असणारं खेळण्यांचं एक दुकान दिसलं. दुकान दिसताच तेथे जाण्याचा मोह काही त्यांना आवरता आला नाही.

गेले दहा बारा दिवस राज्यात अनेक घडामोडी घडत होत्या. अनेक राजकीय पेचप्रसंग तयार झाले पण शेवटी राज्यातील जनतेच्या…

Rohit Rajendra Pawar यांनी वर पोस्ट केले रविवार, १ डिसेंबर, २०१९