288 आमदारांचा वेतन थांबवा : प्रतिक गंगणे

348

पुणे । महाराष्ट्रातील निवडणुकीचा सत्तासंघर्षाचा खेळ अखेर मावळला. पण यात 1 महिना महाराष्ट्राचे नुकसान झाले असून निवडून आलेल्या 288 आमदारांचा वेतन देवू नये अशी मागणी पुणे प्रहारचे संपादक आणि महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रसिध्दी प्रमुख प्रतिक गंगणे यांनी केली आहे.

28 नोव्हेंबरला थेट मा. राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. सर्व 288 आमदारांचे सर्व वेतन आणि भत्ता अशी रक्कम मुख्यमंत्री सहाय्य निधीमध्ये टाकून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना वितरित करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

पत्रात ते पुढे म्हणाले, ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्र हितासाठी निवडून दिले आहे अशा 288 आमदारांनी गेल्या 1 महिन्यात कोणतेही समाज हिताचे कार्य न केल्याने त्यांना त्यांचे या महिन्याचे वेतनरुपी मानधन अथवा कोणतेही भत्ते अदा करु नये. अशीही मागणी त्यांनी केली.