डिलिवरी बॉयकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

207

वॉशिंग मशीनची डिलिवरी देण्यासाठी एक महिन्यापूर्वी आलेल्या आरोपीने अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेत तिचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.

पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश (पूर्ण नाव पत्ता समजू शकला नाही) याला पोलिसांनी अटक केली आहे.

फिर्यादी यांनी एक महिन्यापूर्वी वॉशिंग मशीन घेतली होती. मशीनची डिलिवरी देण्यासाठी आरोपी आकाश घरी आला होता. शुक्रवारी फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असताना आरोपी घरात घुसून त्यांच्या मुलीचा विनयभंग केला. निगडी पोलीस तपास करत आहेत.