शनाया म्हणजेच रसिका सुनील बद्दल या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित नसतील !

221

शनाया म्हणजेच रसिका सुनील बद्दल या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित नसतील.रोज रात्री कोणाच्या घराजवळून चालत गेला तर आवाज येतो तो ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेचा. या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मालिकेच्या कथानकासोबतच यातील भूमिकाही तितक्याच प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यामध्ये राधिका आणि शनाया या दोघींनी खूप जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत. राधिकाला लोकांकडून खूप सहानभूती मिळत आहे तर शनायाला मात्र लोकांच्या संतापाची झळ पोहचत आहे पण यावरून त्यांच्या कामाची पावती त्याला मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला शनाया म्हणजेच रसिका सुनील म्हणजेच रसिका धबडगावकर बद्दल खूप सार्या गोष्टी सांगणार आहे.

रसिका सुनील हीचं पूर्ण नाव रसिका धबडगावकर असं आहे. तिचा जन्म विदर्भातील अकोला येथे झाला असला तरी ती वाढली मुंबईतीच आहे. ती डोंबिवलीत लहानाची मोठी झालीये. रसिका अविवाहीत असून तिचा जन्म 3 ऑगस्ट 1992 मध्ये झालाय. रसिका ही एक अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम सिंगरही आहे. ती एक संगीत विशारद आहे. म्हणजेच गेल्या सात वर्षांपासून ती शास्त्रीय संगीत शिकते आहे. अभिनयाच्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याआधी रसिकाने प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्या अनेक लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गायन केलं आहे. यासोबतच ‘अजिंठा’ या सिनेमासाठी तिने पार्श्वगायनही केलं आहे.

रसिका ही एका उच्चशिक्षीत परिवारातील असून तिचे वडील चार्टर्ड अकाऊंटन्ट आणि तिची आई वकील आहे. तर तिचा भाऊ आयआयटी इंदोरमध्ये शिक्षण घेत आहे. यासोबतच रसिकाने काही नाटय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पारितोषिकेही मिळवले आहेत. ‘बे दुणे पाच’ हे तिचं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. यासोबतच तिने काही जाहीरातींमध्येही काम केलं आहे. रसिकाला अभिनयासाठी पहिली संधी मिळाली ती झक्कास हिरोईनच्या माध्यमातून. या रिलॅलिटी शोनंतर तिला अभिनयासाठी अनेक ऑफर्स येऊ लागल्या. ‘माझ्या नव-याची बायको’ मधून जरी ती लोकप्रिय झाली असली तरी रसिकाने ‘पोश्टर गर्ल’ सिनेमात एक लावणीही केली होती. ही लावणी चांगलीच लोकप्रिय आहे. रसिकाने ‘बघतोस काय मुजरा’ या सिनेमातही अनिकेत विश्वासरावच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.