हॉटस्‍टार स्‍पेशल्‍स सादर करत आहे नवीन सिरीज आऊट ऑफ लव्‍ह

217

हॉटस्‍टार स्‍पेशल्‍स सादर करत आहे नवीन सिरीज ‘आऊट ऑफ लव्‍ह’. ही रोमांचक ड्रामा सिरीज जटिल नात्‍यांमधून निर्माण होणा-या भावनिक व मानसिक दुविधेला सादर करते. या सिरीजमध्‍ये एक महत्‍त्‍वपूर्ण प्रश्‍न विचारण्‍यात आला आहे – तुमचा विश्‍वासघात झाला तर तुम्‍ही क्षमा कराल, सर्वकाही विसरून जाल की त्‍यासाठी लढाल?

अनेक पुरस्‍कार-प्राप्‍त शो ‘डॉक्‍टर फॉस्‍टर’चे अधिकृत रूपांतर असलेली सिरीज ‘आऊट ऑफ लव्‍ह’ एका विवाहाच्‍या रोचक बाबीला सादर करते. या विवाहामध्‍ये विश्‍वासघात आहे, हृदयभंग आहे व धोका आहे. प्रमुख भूमिकेत प्रतिभावान रसिका दुगल व पुरब कोहली असलेल्‍या या शोमध्‍ये सोनी रझदान, हर्ष छाया, अंजन श्रीवास्‍तव आणि संघमित्र हितैषी हे देखील मुख्‍य भूमिकेत आहेत. बीबीसी स्‍टुडिओजची निर्मिती या शोचे दिग्‍दर्शन समीक्षकांद्वारे प्रशंसाप्राप्‍त चित्रपट निर्माते तिग्‍मांशू धुलिया व एजाज खान यांनी केले आहे. हा शो २२ नोव्‍हेंबर २०१९ रोजी फक्‍त हॉटस्‍टार व्‍हीआयपीवर सुरू होत आहे.

स्‍टार इंडियाच्‍या हिंदी एन्‍टरटेन्‍मेंट विभागाचे अध्‍यक्ष व प्रमुख गौरव बॅनर्जी म्‍हणाले, आम्‍हाला प्रेक्षकांसाठी प्रेम, विश्‍वासघात व सूडाबाबतची एक रोमांचक कथा सादर करताना आनंद होत आहे. या पुरस्‍कार-प्राप्‍त ब्रिटीश ड्रामाला महान क्रिएटिव्‍ह टीम व काही अद्वितीय कलाकारांनी सुरेखरित्‍या सादर केले आहे. आम्‍ही आशा करतो की, प्रेक्षक या रोमांचपूर्ण राइडचा आनंद घेतील.”

अभिनेत्री रसिका दुगल म्‍हणाली, आऊट ऑफ लव्‍ह सिरीज त्‍यामधून उद्भवणारे भावनिक क्षोभ व दुविधेला सादर करते. ही सिरीज पात्रकेंद्रित कथानक आहे. मीराच्‍या वास्‍तविकतेला सादर करण्‍याचा माझ्यासाठी तो उत्‍तम अनुभव होता. तिच्‍या परिपूर्ण जीवनामध्‍ये अडथळे आल्‍यानंतर तिला योग्‍य निर्णय घेण्‍यामध्‍ये संघर्ष करावा लागतो, जेव्‍हा तिला समजते की तिचा नवरा तिला फसवत आहे.

अभिनेता पुरब कोहली म्‍हणाला, विश्‍वासघात करणे हे आता सामान्‍य होत चालले आहे. तुम्‍ही देखील स्‍वत: यामध्‍ये अडकून जाऊ शकता. एक जोडीदार दुस-याला फसवत असताना ते जोडपे स्थितीचा कशाप्रकारे सामना करते हे अत्‍यंत व्‍यक्तिनिष्‍ठ आहे. यामध्‍ये फक्‍त वादविवादच होतात असे नाही, अनेकदा लोक नातं वाचवण्‍यासाठी क्षमा करतात किंवा सर्वकाही विसरून जातात. कधी-कधी या गोष्‍टी संपवण्‍यासाठी संघर्ष देखील करावा लागतो.

दिग्‍दर्शक एजाज खान म्‍हणाला, पडद्यावर विश्‍वासघातासाठी फक्‍त महिलांनाच दोषी ठरवण्‍याचे दिवस गेले आहेत. हॉटस्‍टार प्रस्‍तुत ‘आऊट ऑफ लव्‍ह’ सिरीज भावनिक संघर्षाची अत्‍यंत वेगळी बाजू दाखवते. ज्‍यामुळे दिग्‍दर्शक म्‍हणून माझ्यासाठी ही सिरीज आव्‍हानात्‍मक होती. मी नेहमी सादर केल्‍या जाणा-या कथांना मोडून काढत वेगळ्या रूपात कथा सादर करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. तिग्‍मांशू व माझ्यामध्‍ये अत्‍यंत सलोख्‍याचे नाते आहे आणि आम्‍ही या शोमध्‍ये वास्‍तविक सर्जनशीलतेची भर केली आहे. मी आशा करतो की, प्रेक्षक याचा आनंद घेत आम्‍ही घेतलेल्‍या मेहनतीला दाद देतील.”