एलआयसीचे काही लोकप्रिय प्लॅन बंद होणार

235

पुणे | एलआयसी त्यांचे काही लोकप्रिय प्लॅन बंद करणार आहे. इंशुरन्स रेग्युलेटर आयआरडीएआयच्या नव्या गाईडलाईन्सनुसार एलआयसीला त्यांचे काही जुने प्लॅन्स बंद करावे लागणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार याचा ग्राहकांवर फारसा परिणाम होणार नाही. रेग्युलेटर्सनी देशात विमा प्लॅन्ससाठी काही नियम लागू केले आहेत. त्यामुळे हे बदल होत आहेत.

एलआयसीचे काही जुने ३० प्लॅन्स रद्द होत आहेत. मात्र याचसोबत एलआयसी काही नवे प्लॅन्स बाजारात आणणार आहे. अधिक रिटर्न देणारे प्लॅन बंद होत आहेत. तसंच नव्या प्लॅनमध्ये कमी बोनस आणि प्रिमियम अधिक असणार आहे. बंदहोणाऱ्या प्लॅन्समध्ये जीवन आनंद, जीवन उमंग, जीवन लक्ष्य, जीवन लाभ या प्लॅन्सचा समावेश आहे.

मात्र सध्या ज्यांनी या पॉलिसी काढल्या आहेत त्यांच्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही. आधी ठरल्याप्रमाणेच त्यांना रिटर्न मिळणार आहेत. सोशल मीडियावरील अन्य कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये असं एलआयसीने जाहीर केलं आहे.