आयएफआरएस 17 मापदंडांच्या अंमलबजावणीमुळे गुंतवणूकदारांना विविध उद्योगांमध्ये उत्तम व माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी मदत

141

मुंबई, 14 नोव्हेंबर, 2019: इन्स्टिट्यूट ऑफ अॅक्च्युरीज ऑफ इंडिया (आयएआय) या अॅक्ट ऑफ पार्लमेंट अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक संस्थेने मुंबई येथे आयएफआरएस 17 (इंटरनॅशनल फिनान्शिअल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स फॉर इन्शुरन्स काँट्रॅक्ट्स) या एका दिवसाच्या परिषदेचे आयोजन केले होते. आयएफआरएस 17 चे महत्त्व व अंमलबजावणी यावर चर्चा करण्यासाठी, या परिषदेला भारतीय व आंतरराष्ट्रीय अॅक्च्युरिअल व अर्थ क्षेत्रातील नामवंत व्यक्त उपस्थित होत्या. इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स असणाऱ्या आयएफआरएस 17च्या अंमलबजावणीमुळे केवळ अॅक्च्युरिअल दृष्टिकोनातूनच नाही, तर एकंदर कंपनीच्या व या उद्योगाच्या दृष्टिकोनातून केले जाणारे आर्थिक बाबींचे मूल्यमापन व नोंद यावर परिणाम होईल.

आयएआयने आयएफआरएस 17 बाबत क्षमताविकास करण्यासाठी आयोजित केलेल्या सेमिनारच्या मालिकेतील चौथा असणाऱ्या या सेमिनारचे उद्दिष्ट रीइन्शुरन्स, डिस्काउंट रेट व आयएफआरएस 17 एक्स्पोजर ड्राफ्टमधील नव्या सुधारणा यावर सखोल चर्चा करणे, हे होते. यानिमित्ताने, सहभागींमध्ये या विषयावर अशा प्रकारे चर्चा करण्यात आली की भारतीय विमा उद्योग आता आयएफआरएस 17 अंमलबजावणीसाठी सज्ज आहे.

इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स बोर्डाच्या (आयएएसबी) उपाध्यक्ष सु लिऑड यांनी आयएएसबीने आयएफआरएस 17च्या जगभर अंमलबजावणीसाठी उचललेल्या विविध पावलांबद्दल सादरीकरण केले.

“सर्वसाधारण फिनान्शिअल स्टेटमेंटसाठी विमा उद्योग ज्या प्रकारे नोंदी करतो आणि जगभर ज्या प्रकारे व्यवस्थापन करतो त्यामध्ये आयएफआरएस 17 बदल करणार आहे. आयएफआरएस 17 इक्विव्हॅलंटच्या अंमलबजावणीची तारिख अद्याप जाहीर झालेली नाही. या आव्हानाचे रूपांतर संधीमध्ये करण्यासाठी आयएआय सज्ज आहे आणि भारतात आयएफआरएस 17 इक्विव्हॅलंटच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. आरबीसी फ्रेमवर्क व आयएफआरएस 17 इक्विव्हॅलंटची अंमलबजावणी भारतात कदाचित त्याच वेळी होण्याची शक्यता आहे,” असे इन्स्टिट्यूट ऑफ अॅक्च्युरीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुनील शर्मा यांनी सांगितले.

आयएफआरएस 17 मापदंडामुळे विविध अधिकारक्षेत्रात फिनान्शिअल स्टेटमेंट तुलनायोग्य होणार आहे आणि गुंतवणूकदारांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होणार आहे. परिसंवाद हे या कार्यक्रमाचे एक ठळक वैशिष्ट्य होते. त्यामध्ये, आयएफआरएस 17 इक्विव्हॅलंटची भारतात यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी अॅक्च्युरिअल व अकाउंटिंग समुदाय यांतील सहयोग ही मुख्य घटक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. रीइन्शुरन्स, वनरस काँट्रॅक्ट्स हाताळणे, नवीन प्रस्तावित आयएफआरएस 17मधील सुधारणा, डिस्काउंट रेट अशा विषयांवर चर्चा करण्यात आली.

इन्स्टिट्यूट ऑफ अॅक्च्युरीज ऑफ इंडिया (आयएआय)

आयएआय ही भारतातील अॅक्च्युरीज व्यवसायाच्या नियमनासाठी द अॅक्च्युरीज अॅक्ट 2006 (35 ऑफ 2006) या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली वैधानिक संस्था आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभागाने जारी केलेल्या 8 नोव्हेंबर 2006 रोजीच्या प सदर कायद्यातील तरतुदी 10 नोव्हेंबर 2006 पासून लागू झाल्या. याचा परिणाम म्हणून, अगोदरची अॅक्च्युरिअल सोसायटी ऑफ इंडिया विलीन करण्यात आली आणि अॅक्च्युरिअल सोसायटी ऑफ इंडियाच्या सर्व मालमत्ता व दायित्व अॅक्च्युरीज अॅक्ट, 2006 च्या कलम 3 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ अॅक्च्युरीज ऑफ इंडियाकडे हस्तांतरित करण्यात आले व त्यामध्ये विलीन करण्यात आले. पूर्वीच्या अॅक्च्युरिअल सोसायटी ऑफ इंडियाची (एएसआय) स्थापना सप्टेंबर 1944 मध्ये करण्यात आली. 1979 पासून एएसआय ही इंटरनॅशनल अॅक्च्युरिअल सोसायटीची पूर्ण सदस्य आहे (जगभरातील सर्व अॅक्च्युरिअल संस्थांसाठी अम्ब्रेला ऑर्गनायझेशन) आणि सक्रियपणे आपल्या उपक्रमांमध्ये कार्यरत आहे. 1982 मध्ये, 1860 सालच्या रजिस्ट्रेशन ऑफ लिटररी, सायण्टिफिक अँड चॅरिटेबल सोसायटीज अॅक्ट XXI अंतर्गत आणि बॉम्बे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अॅक्ट, 1950 याअंतर्गतही एएसआयची नोंदणी करण्यात आली. 1989 मध्ये, एएसआयने असोसिएट स्तरापर्यंक परीक्षा सुरू केल्या आणि 1991 मध्ये फेलोशिप स्तरावरील परीक्षा सुरू केल्या, त्यातून अॅक्च्युरीसाठी प्रोफेशनल पात्रता निर्माण झाली. तोपर्यंत, मान्यता लंडनमधील इन्स्टिट्यूट ऑफ अॅक्च्युरीजच्या (आता इन्स्टिट्यूट अँड फॅकल्टी ऑफ अॅक्च्युरीज) परीक्षांवर आधारित होती.