इंडियन केमिकल कौन्सिलने (आयसीसी) जगभर स्पर्धात्मक केमिकल उद्योग उभारण्यासाठी पर्यावरण शाश्वततेला दिले महत्त्व 

95

इंडियन केमिकल कौन्सिल (आयसीसी)या भारतातील केमिकल उद्योगासाठीच्या सर्वोच्च संघटनेने नवी दिल्ली येथे 4 व 5 नोव्हेंबर 2019 रोजी पर्यावरण शाश्वततेवरील दोन दिवसांच्या परिषदेचे आयोजन केले होते.या परिषदेच्या निमित्ताने, भारतीय केमिकल उद्योगाचे महत्त्व व भविष्य यावर चर्चा करण्यासाठी प्रमुख धोरणकर्त्यांबरोबर जगभरातील मान्यवर व्यक्ती एकाच व्यासपीठावर एकत्र आल्या होत्या. युनायटेड नेशन्स एन्व्हॉयर्नमेंट प्रोग्रॅम (यूएनईपी), इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ केमिकल असोसिएशन्स (आयसीसीए) यांच्याबरोबर संयुक्तपणे आणि पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, केंद्रीय रसायने व खते मंत्रालयाचा केमिकल्स व पेट्रोकेमिकल्स विभाग यांच्या पाठिंब्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट केमिकलचे पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित व्यवस्थापन करण्यासाठी उपाय व उपक्रम यावर चर्चा करणे, तसेच जगभर शाश्वत विकासासाठी महत्त्वाच्या घटकांबरोबर काम करणे, हे आहे.परिषदेमध्ये प्रमुख वक्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि आपले विचार मांडले – प्रकाश जावडेकर (केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री),पी. आर. राव (सचिव, केंद्रीय डीसीपी), रवी कपूर (अध्यक्ष, सस्टेनेबिलिटी एक्स्पर्ट कमिटी, इंडियन केमिकल कौन्सिल), नीना सिंग (व्यवस्थापकीय भागीदार, ईआरएम इंडिया), विजय शंकर (अध्यक्ष, इंडियन केमिकल कौन्सिल), रेनाता लोक-देस्सलिएन (भारतासाठी संयुक्त राष्ट्रांच्या निवासी समन्वयक), अजय दुर्रानी (व्यवस्थापकीय संचालक, कोव्हेस्ट्रो इंडिया), जॅकलिन अल्वरेज (अक्टिंग चीफ, केमिकल्स व हेल्थ ब्रँच, यूएनईपी), आणि राकेश भारतीया (मुख्य कार्यकारी अधिकारी, इंडिया ग्लायकोल्स लि.).

भारतीय केमिकल उद्योगा हा उद्योगांचा उद्योग असून त्यांची एकत्रित उलाढाल 160 अब्ज डॉलर असून त्यामध्ये देशाच्या आर्थिक वाढीपेक्षा 100 बेसिस पॉइंट अधिक वाढ होत आहे. आयसीसी सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्हच्या निमित्ताने, मंत्रालयातील व उद्योगातील निर्णयकर्ते प्रदूषण व हवामानातील बदल या बाबतीत देशासमोर असणाऱ्या समस्यांबद्दल कृतीयोग्य चर्चा करण्यासाठी एकत्र येतात.पर्यावरणाची शाश्वतता कायम राखत व्यवसायात वाढ करण्यासाठी, रिस्पॉन्सिबल केअर या घटकाचा समावेश करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी या उद्योगातील मान्यवरांनी पुढाकार घ्यायला हवा.

“केमिकल्सच्या संपूर्ण जीवनचक्राच्या शाश्वत व्यवस्थापना उत्तेजन देणारा हा उपक्रम सर्व उत्पादक, निर्माते व ग्राहक यांच्यासाठी प्राधान्याचा आहे. केमिकल्सची शाश्वतता वाढवण्यासाठी केमिकल उद्योगाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. भूमिगत व वाहत्या पाण्याचे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने केमिकल्सच्या पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केमिकल उद्योगाचे योगदान महत्त्वाचे आहे. परिषदेतील चर्चेमुळे केमिकल उद्योगाला आपली पृथ्वी हरित आणि आगामी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्यासाठी अर्थपूर्ण व कायमस्वरूपी योगदान देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, याची खात्री आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन केमिकल कौन्सिलला दिलेल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

“देशाची प्रगती व्हायची असेल तर रिस्पॉन्सिबल केअर आणि सेल्फ-रेग्युलेटरी यंत्रणाची नितांत गरज आहे. भारतीय केमिकल उद्योगाच्या कल्याणासाठी सक्षम बल विकसित करण्यासाठी आपण संस्थात्मक यंत्रणा तयार करणे गरजेचे आहे. सध्या, प्लास्टिकचा वापर अटळ आहे, परंतु प्लास्टिकचे चुकीचे संकलन व विल्हेवाट यामुळे पर्यावरणासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. उद्योगामध्ये, तसेच ग्राहकांमध्ये होणार बदल आपण लक्षात घ्यायला हवेत. आपल्या सवयीमध्ये बदल करणे आणि प्लास्टिक व पाणी यांचा वापर जबाबदारपणे करून जबाबदार नागरिक बनणे अतिशय गरजेचे आहे. कारण, प्लास्टिक व पाणी हे भारतातील केमिकल उद्योगाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक घटक आहेत”, असे भारत केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानातील बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

“गुंतवणूक आकृष्ट करणयासाठी देशात शाश्वत वातावरण निर्माण होईल, याची काळजी आपण घेणे आवश्यक आहे. भारत सरकार व विविध क्षेत्रांतील सर्व घटक गुंतवणूक व धोरणे या बाबतीत जे काही करतात ते नेहमी हरित विश्व निर्माण करण्यासाठी पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दिशेने असते.शेजारच्या देशांवर अवलंबून राहण्याऐवजी, भारत हा एक सक्षम देश असल्याचे प्रस्थापित करणे, हे भारतीय केमिकल उद्योगाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे केमिकल व पेट्रोकेमिकल विभागाचे केंद्रीय सचिव पी. आर. राव यांनी सांगितले.

“2024-25 पर्यंत भारत ही 5 ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला चालना देणारा केमिकल उद्योग हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे. आपल्या दैनंदिन जीवनात केमिकल हा अविभाज्य घटक ठरत असल्याने, आपण शाश्वत यंत्रणा विकसित करणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठरेल, असा पर्यावरणाबाबत जागरुक उद्योग विकसित करणे गरजेचे आहे”, असेइंडियन केमिकल कौन्सिलचे अध्यक्ष विजय शंकर यांनी सांगितले.

इंडियन केमिकल कौन्सिलविषयी

इंडियन केमिकल कौन्सिल (आयसीसी) ही सर्वोच्च राष्ट्रीय संघटना भारतातील केमिकल उद्योगाच्या सर्व शाखांचे प्रतिनिधीत्व करते, जसे ऑरगॅनिक व इनऑरगॅनिक केमिकल्स, प्लास्टिक्स व पेट्रोकेमिकल्स व पेट्रोलिअम रिफायनरीज, डायस्टफ व डाय-इंटरमीडिएट्स, खते व कीटकनाशके, स्पेशालिटी केमिकल्स, पेंट्स.

इंडियन केमिकल कौन्सिल भारतीय केमिकल उद्योगाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. 1938 मध्ये स्थापन झालेल्या आयसीसीने गेल्या काही वर्षांत भारतीय केमिकल उद्योगाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या कार्यात व सेवांत वाढ केली आहे.