‘सूर्यदत्ता प्रॉडक्शन्स’ देणार टेलिव्हिजन, फिल्म मेकिंगशी संलग्नित करिअरच्या संधींचे व्यासपीठ

249

कौशल्य विकास अभियानांतर्गत ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि ‘एमईएससी’ यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार

पुणे : ”महाविद्यालयात दिल्या जाणाऱ्या ज्ञानाला कृतिशीलतेची जोड देण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना अनुभवसंपन्न बनविण्याकरिता सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने नियमित नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. त्या पद्धतीचे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. सध्या संस्थेत इंटिरिअर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, ब्युटी अँड वेलनेस, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल, टुरिजम, एव्हिएशन, जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन, ग्राफिक्स, मल्टिमीडिया, ऍनिमेशन, परफॉर्मिंग आर्टस् अशा प्रकारचे ६५ हुन अधिक कमी कालावधी व पूर्णवेळ अभ्यासक्रम चालविले जातात. टेलिव्हिजन, फिल्म मेकिंग क्षेत्रात असलेल्या अफाट संधींचा लाभ विद्यार्थ्यांसह तरुणांना व्हावा, यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ‘सूर्यदत्ता प्रॉडक्शन्स’ हा विभाग सुरु करण्यात येणार आहे. त्यामार्फत या क्षेत्राशी निगडित विविध लघुकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या फिल्मची निर्मिती करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे संस्थेच्या विद्यार्थ्यांसह इतर तरुणांना आणि मनोरंजन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या कोणालाही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे,” अशी माहिती सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे सल्लागार सचिन इटकर, संचालिका कॅप्टन शालिनी नायर, अक्षित कुशल, अनिमेशन विभागाचे प्रमुख प्रा. अंकित जैन, कुलसचिव नूतन गवळी, प्रशासन व्यवस्थापक रोहित संचेती आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या कौशल्य विकास अभियानांतर्गत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या एंटरप्रेन्युअरशिप अँड स्किल डेव्हलपमेंटअंतर्गत सूर्यदत्ता इन्स्टिट्युट ऑफ मास कम्युनिकेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट आणि मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल कौंन्सिल (एमइएससी) यांच्यात नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. गोरेगाव येथील मुक्ता आर्टसमध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, स्किल इंडिया अभियान, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मंथन’ या कार्यक्रमात दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या सामंजस्य कराराचे आदानप्रदान केले गेले. मुंबईतील या कार्यक्रमात मीडिया अँड स्लिक कौन्सिल साऊथ रिजनल विभागाच्या ज्योती जोशी, मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सुब्बा राव, व्हिसलिंग वुड इंटरनशनलच्या उपाध्यक्ष चैतन्य चिंचलीकर, ‘एमइएससी’चे मोहित सोनी, सिनेमा अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे अमित बेहेल, ‘एमइएससी’चे आणि व्हिसलिंग वुड इंटरनशनलचे संचालक सुभाष घई, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते. मीडिया आणि एंटरटेनमेंट, चित्रपट निर्मिती, तसेच या क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधी याविषयी ‘मंथन’मध्ये मार्गदर्शन झाले. सुभाष घई यांनी त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील आजवरच्या कारकिर्दीतील अनुभव व आठवणीना उजाळा दिला. ‘सूर्यदत्ता’सह चंदिगड येथील चितकारा, दिल्लीमधील शारदा व सेंच्युरीअन, चेन्नईमधील इरिट्रिया, कोलकत्ता येथील जेआयएस या विद्यापीठासोबतही शैक्षणिक सामंज्यस्य करार करण्यात आले आहे.”
या शैक्षणिक सामंजस्य कराराविषयी बोलताना डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ”सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या २० वर्षापासून विविध अभ्यासक्रम राबविले जात आहेत. संस्थेच्या कार्याची, अनुभवाची व गुणवत्तेची दखल घेत हा शैक्षणिक सामंजस्य करार झाला आहे. आमच्यासाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे. संस्थेत चालणाऱ्या विविध अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यंना निरनिराळ्या क्षेत्रात संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांना अभिनय, मीडिया इन कम्युनिकेशन, ऍनिमेशन फिल्म एंटरटेनमेंट ऍण्ड व्हीएफएक्स, फिल्म मेकिंग, परफॉर्मिंग आर्टस या विषयातील पदवीचे शिक्षण दिले जात असून, या विषयातील तीन, सहा महिने आणि एक वर्षाच्या कालावधीचे अभ्यासक्रम सुरु आहेत. याशिवाय जर्नलिझम इन मास कम्युनिकेशन, मास्टर इन जर्नालिझम ऍण्ड मास कम्युनिकेशन, डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट आदी विषयांचे अभ्यासक्रम संस्थेत राबविले जात आहेत. ‘सूर्यदत्ता प्रॉडक्शन’मुळे विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रॉजेक्ट करण्याचे अनुभव मिळतील. शॉर्ट फिल्म, ऍनिमेशन, बायोपिक आदी विविध प्रोजेक्ट्साठी त्यांना मदत होईल. संस्थेतून बाहेर पडलेला विद्यार्थी पूर्णपणे तयार होऊन बाहेर पडेल. आजवर संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यर्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले. तसेच ते विविध नामवंत कंपन्यात उच्च पदावर कार्यरत आहेत. सूर्यदत्ताने केलेल्या करारामुळे तसेच प्रोडक्शन हाऊसमुळे चित्रपट, ऍनिमेशन, इव्हेन्ट मनजमेंट, जाहिरात, रेडिओ, डिजिटल आणि प्रिंट मीडिया आदी क्षेत्रात रोजगाराच्या आणि व्यवसायच्या संधी उपलब्ध होतील.” विद्यार्थ्यांमध्ये दडलेले गुण शोधून त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी लागणाऱ्या बऱ्याचशा सुविधा संस्थेच्या कॅम्पसमध्ये आहेत. उर्वरित सोयी लवकरच उभारल्या जाणार असून, बहुउद्देशीय विभाग सुरु होणार आहे.

सचिन इटकर म्हणाले, ”नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या सूर्यदत्ता ग्रुपने मनोरंजन क्षेत्रात टाकलेले पाऊल कौतुकास्पद आहे. शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच होत आहे. या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत स्टुडिओ निर्मिती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच पुणे आणि परिसरातील संस्थांना व तरुणांना याचा फायदा होईल. येथे येणाऱ्या लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, तंत्रज्ञ अशा विविध तज्ज्ञांकडून मुलांना नवीन काहीतरी शिकायला मिळेल. मनोरंजन क्षेत्राशी संबंधित काम करू इच्छिणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि कौशल्यासह प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव या ‘सूर्यदत्ता प्रॉडक्शन्स’मधून मिळेल, असा विश्वास वाटतो.”