एगॉन लाइफ आयटर्म (iTerm) इन्शुरन्स प्लॅन विम्याच्या रकमेचा परतावा आणि इतर अनेक लाभांसह भारतातील टर्म इन्शुरन्स क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यास सज्ज
मुंबई, नोव्हेंबर 2019: एगॉन लाइफ इन्शुरन्सने आज ‘आयटर्म’ इन्शुरन्स प्लॅन या आपल्या अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाच्या प्लॅनचे नवे स्वरूप सादर केले. यात अनेक लाभ समाविष्ट आहेत.
नव्या एगॉन लाइफ आयटर्म इन्शुरन्स प्लॅनमध्ये वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला नियमित मासिक उत्पन्न मिळेल. तसेच, वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत यात आर्थिक संरक्षण पुरवले जाते. ग्राहकांना यात तीन पर्यायांमधून निवड करण्याची मुभा आहे तसेच त्यांना विविध लाभही दिले जाणार आहेत.
एगॉन लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत अरोरा म्हणाले, “भारतात टर्म प्लॅनचे नवे स्वरूप सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. या प्लॅनमध्ये वयाच्या 60 वर्षांनंतर नियमित मासिक उत्पन्न मिळते. इतकेच नाही. या प्लॅनमध्ये वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत संरक्षण दिले जाते. त्यामुळे, ड्युएल प्रोटेक्शन पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही कुटुंबाला सुरक्षितता प्रदान करालच. शिवाय, साठीनंतर नियमित मासिक उत्पन्नही मिळवू शकाल.
उदा. एका 30 वर्षीय धूम्रपान न करणाऱ्या पुरुषाने 100 व्या वर्षापर्यंतचा एक कोटीचा विमा घेतला.ड्युएल प्रोटेक्ट पर्यायाअंतर्गत त्याला 60 व्या वाढदिवसाला एकरकमी पाच लाख रुपये दिले जातील. शिवाय, त्याला दरमहा 10,000 रुपये म्हणजे एक कोटी विमा रकमेच्या 0.1 % रक्कम मासिक स्वरुपावर मिळेल.”
“टर्म प्लॅनमध्ये जीवंत असताना कोणताही परतावा मिळत नसल्याने अनेक ग्राहक काहीसे कचरतात. बाजारपेठेतील ही गरज आम्ही पूर्ण करत आहोत. यासाठी ग्राहकांना टर्म संरक्षण आणि जीवंतपणीचे लाभ दिले जातील. भारतात टर्म इन्शुरन्सचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक मोठे पाऊल आहे.
या सर्वसमावेशक उत्पादनात धूम्रपान सोडा, विम्यात आपोआप वाढ, आयुष्याच्या विविध टप्प्यावरील लाभ आणि इन्स्टाकव्हर असे अतिरिक्त लाभही आहेत.
आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारण्याच्या दृष्टीने ‘क्विट स्मोकिंग बेनिफिट’ ग्राहकांना धूम्रपान सोडण्याची प्रेरणा देते आणि ही सवय सोडल्यानंतर भविष्यातील प्रीमिअममध्येही सवलत दिली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
या टर्म प्लॅनमध्ये ग्राहकांना निवडीसाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत – ड्युएल प्रोटेक्ट, लाइफ प्रोटेक्ट आणि प्रोटेक्ट प्लस
प्लॅनचा पर्याय | प्लॅनचे लाभ | |||||
इन्स्टाकव्हर | मृत्यूपश्चात लाभ | टर्मिनल इलनेस लाभ | लाइफ स्टेज पर्याय | विमा लाभात वाढ | जीवंत राहिल्यास लाभ | |
लाइफ प्रोटेक्ट | ü | ü | ü | ü | काहीच नाही | काहीच नाही |
प्रोटेक्ट प्लस | ü | ü | ü | काहीच नाही | ü | काहीच नाही |
ड्युएल प्रोटेक्ट | ü | ü | ü | काहीच नाही | काहीच नाही | ü |
एगॉन लाइफ आयटर्म इन्शुरन्स प्लॅन सर्व व्यासपीठे आणि माध्यमांद्वारे उपलब्ध आहे. ग्राहकांना लाभ होतील अशी या उत्पादनाची काही ठळक वैशिष्ट्ये
- लाभ सुरू होण्यासाठी फार काळ वाट पहावी न लागता वयाच्या 60 व्या वर्षापासून नियमित मासिक उत्पन्न सुरू
- महागाईच्या दराशी सुसंगत राहण्यासाठी दरवर्षी विम्याची रक्कम वाढणार
- आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारल्यास लाभ
- आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर जीवन विमा वाढवण्याची लवचिकता
- गंभीर आजाराचे निदान झाल्यास आर्थिक संरक्षण
- विम्याचे नियम आणि प्रीमिअम भरण्याच्या पर्यायांमध्ये लवचिकता
- ‘इट पेज टू क्विट स्मोकिंग’ या लाभाअंतर्गत धूम्रपान करणाऱ्यांसाठी धूम्रपान सोडल्यास विम्याच्या दुसऱ्या वर्षापासून प्रीमिअममध्ये सवलत
- ठराविक काळासाठी प्रीमिअम भरून विम्याच्या संपूर्ण काळात विम्याचे लाभ घेण्याचा पर्याय
- डेथ बेनिफिट पेआऊटसाठी पर्यायांची लवचिकता :
- ü एकरकमी पेमेंट
- ü 100 महिन्यांसाठी ठराविक मासिक उत्पन्न
- ü वरील दोन्ही पर्यायांचा मेळ
- संबंधित कर नियमांनुसार प्रीमिअम आणि लाभांवरील करांमध्ये सवलत
एगॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी
एगॉन लाइन ही भारतातील एक आघाडीची डिजिटल इन्शुरन्स कंपनी आहे. ही नव्या युगातील डिजिटल सर्विस कंपनी भारतात ऑनलाइन टर्म प्लॅन सादर करणाऱ्या पहिल्या काही कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे. ऑनलाइन प्रोटेक्शन स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या एगॉन लाइफकडे कंपनीची स्वत:ची सर्विस टीम आहे. ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी ही टीम सुसज्ज आहे.
नव्या युगातील लाइफ इन्शुरन्स कंपनीमध्ये सर्वाधिक प्राधान्यक्रमाच्या या कंपनीच्या डायरेक्ट टू कस्टमर दृष्टिकोनामुळे अधिक स्पष्टता आणि पारदर्शकपणा जपत ग्राहकांशी थेट संवाद साधला जातो. https://www.aegonlife.com/
एगॉन बद्दल :
एगॉनचा इतिहास तरा दोन शतकांपासूनचा आहे. अर्थात आपल्याला माहीत असलेल्या एगॉनची स्थापना 1983 मध्ये एजीओ आणि एनीआ या दोन डच इन्शुरन्स कंपन्यांच्या एकत्रीकरणातून झाली. आज एगॉन ही जगातील आघाडीच्या 10 विमा कंपन्यांमध्ये गणली जाते. एगॉन जीवन विमा, पेन्शन आणि असेट मॅनेजमेंट पुरवणारी जगातील आघाडीची कंपनी आहे. त्यांचे मुख्यालय नेदरलँड्समध्ये द हॉग येथे आहे.