१९ वर्षांखालील राष्ट्रीय बास्केट बॉल स्पर्धेसाठी ‘सूर्यदत्ता’च्या जितेंद्र चौधरीची निवड

204

पुणे : बावधन येथील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित सूर्यदत्ता पब्लिक स्कुलच्या जितेंद्र चौधरीची १९ वर्षाखालील राष्ट्रीय बास्केट बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर जितेंद्र चौधरी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याने सूर्यदत्ता संस्थेसाठी हा आनंदी क्षण आहे. नुकत्याच झालेल्या पुणे विभागीय आणि राज्यस्तरीय बास्केट बॉल स्पर्धेत सूर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली.

या संघातील जितेंद्र चौधरीने लक्षवेधी कामगिरी लक्षवेधी राहिल्याने त्याची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली असून, तो आता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. जितेंद्र चौधरी सूर्यदत्ता पब्लिक स्कुलमध्ये बारावीत शिकत आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी सूर्यदत्ता फिटनेस आणि स्पोर्टच्या डायरेक्टर निशिगंधा पाटील, संकेत नालकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “जितेंद्र चौधरीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. त्यांच्याप्रमाणेच संस्थेतील इतरही विद्यार्थी विविध क्रीड़ा स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड रुजण्यासाठी संस्थेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

खेळामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहते. सामाजिक भान, सांघिक भावना, नेतृत्व, सहनशीलता आदी गोष्टी मुलांना त्यातून आत्मसात करता येतात. शिस्तीच्या सवयींबरोबरच त्यांना अपयशातून यश मिळवण्याचा विश्वास मिळतो. त्यामुळे ‘सूर्यदत्ता’मध्ये अभ्यासक्रमाबरोबरच खेळांनाही तितकेच महत्व दिले जाते. फिजिकल डायरेक्टर या खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी सातत्याने मेहनत घेत आहेत.”