Audi India : ऑडी इंडियाकडून २०२३ मध्‍ये ८९ टक्‍के वाढीची नोंद

Audi India विक्री

ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने जानेवारी ते डिसेंबर २०२३ कालावधीत ७,९३१ युनिट्सची विक्री करत ८९ टक्‍क्‍यांच्‍या प्रबळ वाढीची घोषणा केली. या सकारात्‍मक वाढीचे श्रेय लाँच करण्‍यात आलेली तीन नवीन उत्‍पादने: ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक, ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ई-ट्रॉन, तसेच सर्वाधिक विक्री होणाऱ्या ऑडी ए४, ऑडी ए६ आणि ऑडी क्‍यू५ यांच्‍यासाठी सातत्‍यपूर्ण मागणीला जाते.

Audi India

टॉप-ऑफ-द-लाइन कार्स जसे ऑडी क्‍यू७, ऑडी क्‍यू८, ऑडी ए८ एल, ऑडी एस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस क्‍यू८, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी यांच्‍यासाठी प्रबळ मागणी कायम राहिली.

२०२३ च्‍या चौथ्‍या तिमाहीत ९४ टक्‍के वाढीसह २,४०१ रिटेल युनिट्सची विक्री झाली. एसयूव्‍ही श्रेणीने १७४ टक्‍के वाढीची नोंद केली तर परफॉर्मन्‍स व लाइफस्‍टाइल कार्ससह ई-ट्रॉन श्रेणीमध्‍ये ४० टक्‍क्‍यांची वाढ नोंदवण्यात आली. तसेच प्रत्‍येक चारपैकी एक ग्राहक रिपीट ऑडी ग्राहक आहे.

Audi India

Audi India उत्‍पादन

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, ”२०२३ आमच्‍यासाठी आणखी एक यशस्‍वी वर्ष ठरले आणि आमच्‍या वैविध्‍यपूर्ण व इच्छित उत्‍पादन पोर्टफोलिओला प्रबळ मागणी मिळत आहे. आम्‍ही इंडस्‍ट्री-फर्स्‍ट उपक्रम राबवत आणि अद्वितीय लक्‍झरी अनुभव देत प्रगतीच्‍या दिेशेने स्थिर गतीने वाटचाल करत आहोत.

Audi India

आमची रिटेल उपस्थिती वाढत आहे, जेथे देशभरात एकूण ६४ टचपॉइण्‍ट्स (शोरूम्‍स व वर्कशॉप्‍ससह) आणि २५ ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लस शोरूम्‍ससह वर्षाचा शेवट झाला. आम्‍हाला विश्‍वास आहे की, ही गती २०२४ देखील कायम राहिल.”

Audi India ऑडी अप्रूव्‍ह्ड:प्‍लस या पूर्व-मालकीच्‍या कार व्‍यवसायाने २०२३ मध्‍ये ६२ टक्‍क्‍यांच्‍या वाढीची नोंद केली. सध्‍या देशातील सर्व प्रमुख हब्‍समध्‍ये २५ ऑडी अप्रूव्‍ह्ड-प्‍लससह कार्यरत असलेला ब्रॅण्‍ड या वर्षात विस्‍तार करेल आणि अधिकाधिक पूर्व-मालकीच्‍या कार सुविधांना सादर करेल.

संबंधित बातम्या :

Samsung Galaxy S24 : आयफोनला टक्कर देणाऱ्या Samsung Galaxy S24 सीरीजची किंमत समोर

Vivo X100 Series : विवो एक्स १०० सीरिज भारतात लॉन्च; कॅमेरा क्वालिटीत आयफोनपेक्षा वरचढ