2.77 एकर जागेवर राम मंदिर; मात्र उरलेल्या 60-65 एकर जागेचं काय?

82

नवी दिल्ली | अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा रामलल्लाची असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं आहे. त्यामुळे वादग्रस्त २.७७ जागेवर आता राम मंदिर बनणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र उरलेल्या ६०-६५ एकर जागेचं काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अयोध्येत एकूण ६७ एकर जागा आहे. या एकूण जागेपैकी २.७७ एकर जागेबाबतच वाद होता. त्यामुळे न्यायालयाने फक्त एवढ्याच वादग्रस्त जागेवर निकाल दिला आहे.

वाद निर्माण झाल्यानंतर सरकारने एक कायदा केला होता. अयोध्या लँड अॅक्विझिशन अॅक्ट १९९३ असं या कायद्याचं नाव आहे. या कायद्याद्वारे सरकारने उर्वरित जागा स्वतःकडे घेतली होती.