पब्जी मोबाईल गेम खेळणा-यांना खुशखबर! गेमर्संना मिळणार 200 रुपयांचे कुपन

125

नवी दिल्लीः पब्जी मोबाईल गेम खेळणा-यांना एक खुशखबर आहे. हा गेम खेळणा-यांना 200 रुपयांचे डिस्काऊंट कुपनची ऑफर देण्यात येणार आहे. गुगल प्ले स्टोरवर नोटीफिकेशनमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली असून गेम खेळताना या 200 रुपयांच्या डिस्काऊंट कुपनचा वापर गेमर्संना करता येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे या ऑफरचा लाभ लिमिटेड मर्यादेसाठीच आहे. दरम्यान, यासाठीही काही अटी आणि शर्ती लागू आहेत.

पब्जी मोबाईल गेममध्ये देण्यात येणा-या 200 रुपयांच्या कुपन हे डिस्काऊंट कुपन आहे. त्यामुळे या डिस्काऊंट कंपनचा लाभ घेण्यासाठी गेमर्संना पब्जी मोबाईल स्टोरमधून 350 रुपयांपर्यंतच्या आयटम्सची खरेदी करावी लागणार आहे.

पब्जी मोबाईल खेळणा-यांमध्ये दोन गट आहेत. त्यामध्ये एक गट असा आहे जो गेमिंगसाठी खर्च करतो. तर, दुसरा गट हा मोफत गेम खळतो. त्यामुळे पैसे खर्च करुन पब्जी मोबाईल गेम खेळणा-यांना उत्कृष्ट गेमिंगचा अनुभव प्रदान करण्यासाठी ही मोठी ऑफर देण्यात आली आहे.

200 रुपये कुपनचा लाभ रॉयल पास सीझन 10 किंवा कुठल्याही गेम आयटममध्ये 350 रुपयांपर्यंतच्या आयटम्सची खरेदीवर मिळणार आहे. स्वस्तात स्वस्त आयटम्सची खरेदी केल्यानंतर युसी पॉईंट्सवर 350 रुपयांवर 200 रुपयांचे डिस्काऊंट मिळेल. म्हणजेच केवळ 150 रुपयांमध्ये तुम्हाला अधिक युसी पॉईंट्स कमवता येणार आहे. 200 रुपयांच्या कुपनचा वापर गेम खेळतांना गेमर्संना कुठलं आयटम खरेदीसाठी करता येणार आहे.