पुणे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात  निवडणुक होणार बहुरंगी

97
पुणे (मनोज महादेव शेट्टी) : वडगावशेरी मतदारसंघात आजवर कांग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे
वडगावशेरी मतदारसंघ कांग्रेस-राष्ट्रवादी चा बालेकिल्ला राहिलेला आहे, मा.रामभाऊ मोझे, स्वर्गीय मा.चंद्रकांत छाजेड, मा.सौ कमल ढोलेपाटील, मा.बापूसाहेब पठारे या आघाडीच्या नेत्यांची विधानसभेवर आमदार म्हणून वर्णी लागली
२०१४ च्या निवडणुकीत मात्र वडगावशेरी मतदारसंघाला सुरंग लागले. मोदी लाट आणि आमदारांचे नागरिकांशी असलेला कमकुवत संपर्क, पक्षांमध्येचं झालेलीे गटबाजी, क्रॉस वोटींग, कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा घेतलेला निर्णय अशा अनेक कारणे अंगलट आली आणि बीजेपी ची धमाकेदार एंट्री आमदार जगदीश मुळीक यांच्या रुपात झाली
परंतु २०१४ च्या निवडणुकीत जे मागच्या आमदारांनी जे केलं म्हणजे स्थानिक प्रभागाचा विकास, कमकुवत जनसंपर्क याचीच पुनरावृत्ती नवनिर्वाचित बीजेपीच्या आमदाराने केल्याचं दिसून येते त्यामुळे २०१९ निवडणूक पुन्हा सत्ता बदलाची शक्यता नाकारता येत नाही
२०१९ च्या विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेनेे ही शर्तीचे पर्यत करत हालचालींना वेग दिल्याचं पाहायला मिळत आहे
भाजपा शिवसेना ( युती )आणि कांग्रेस राष्ट्रवादी (आघाडी) अशी खरी लढत पाहायला मिळायची, मात्र यावेळी बीजेपी, शिवसेना,मनसे, कांग्रेस -राष्ट्रवादी (आघाडी) याच सोबत भीमा कोरेगाव, औरंगाबाद, पुढील महिन्यातील मुस्लिम मुकमोर्चा या प्रश्नांचा फायदा घेत एमआयएम आणि बसपा या पक्षांचा ही मोठ्या प्रमाणावर निवडणुकांमध्ये प्रभाव पाहायला मिळणार आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात तिरंगी नाही तर बहुरंगी लढत पाहायला मिळेल