राष्ट्रतेजच्या संपादकांना फसवून सव्वा दोन लाखांचा अपहार

294

उमेश कदम, बिबिषण काळे व नेहा वडके यांचे संगनमत

पैसे चोरून नविन दैनिक चालू करण्याचा प्रयत्न फसला

पुणे (प्रतिनिधी) : पुणे शहरातील 40 वर्षे जुने व नियमित प्रकाशित होणारे दै. राष्ट्रतेज दैनिकाचे संपादक, स्वातंत्र सैनिक तथा विधीतज्ञ अमरसिंह ज्योत्यातीराव जाधवराव यांचा विश्वास संपादन करुन सव्वा दोन लाख रुपये बेरर चेकने बँक खात्यातुन काढुन तिघांनी पोबारा केला.

संगनमताने बँकेतुन सव्वा दोन लाखाची चोरी करणारांमध्ये फरार आरोपी दैनिक राष्ट्रतेजमध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम करणारा उमेश तानाजी कदम, रा. सिंहगड रोड, ऑफिस बॉय बीबीषण काळे, अकौंटंट नेहा वडके यांचा त्यात समावेश आहे.

तिनीही आरोपी चतुररस्त्र आहेत. बीबीषण काळे हा वारजे घरकुल येथील रहिवासी आहे. तर नेहा वडके कसबा पेठ येथील तांबट आळी येथे राहणेस आहे. तपास काम पोलीस यंत्रणा तिघांच्या घरी जाऊन आले असता तिघांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन जबाब दिला आहे.

दै. राष्ट्रतेजच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी नेहा वडके हिच्याकडे सोपविण्यात आली होती. कॅशचा व चेक बुक्सचा संपुर्ण ताबा नेहा वडकेकडे होता. उमेश कदम, बिबिषण काळे व नेहा वडके यांनी दिशाभुल करुन चार चेक्सचे पाने काढुन चेक इंडियन ओव्हरसिज बँक शनिवार पेठ शाखा येथुन विधीतज्ञ अमरसिंह जाधवराव यांच्या नावाच्या चार धनादेशवर (चेक्सवर) बनावट स्वाक्षर्‍याकरून दि. 15.6.2019 रोजी एक लाख, दि. 17.7.2019 रोजी 50 हजार, दि. 20.5.2019 रोजी 30 हजार, दि. 24.5.2019 रोजी 45 हजार असे एकूण एक लाख पंचवीस हजार रूपये बेअरर चेकने चोरली.

जाधवराव यांच्या मालकीच्या चेकबुक्स नेहा वडके यांच्या ताब्यात होत्या धनादेश क्र. 833229, 833230, 833253, 833255 असे मुळ धनादेश होते.

तिघा आरोपी विरुद्ध विश्रामबागवाडा पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन संपादक अँड. अमरसिंह जाधवराव यांनी दस्तुर खुद्द हजर राहुन जबाब नोंदवला त्यामुळे तत्परतेने गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. वरील तिनही आरोपी कार्यालयात एक दिलाने राहत होते. त्यांच्या कामावर अमरसिंह जाधवराव यांनी बारीक नजर ठेवली होती. चुकलेले आरोपी अखेर जाधवराव यांच्या जाळ्यात अडकले. चेक बुक्सची तपासणी व बँकेतील आर्थिक स्थितीचा अ‍ॅड. अमरसिंह जाधवराव यांनी लेख जोखा पाहिल्यावर सव्वा दोन लाखाची चोरी उघडकीस आली.

उमेश कदम हा बाहेरील लोकांना सांगत असे कि दै. राष्ट्रतेज मी स्वत: चालवायला घेतला आहे त्या आधारावर माध्यमातील पी.आर. व्यक्तींकडुन बातम्या छापणाच्याच्या नावाखाली माया उकळत असे.

अमरसिंह जाधवराव पुढे म्हणाले की, अ‍ॅक्सिस बँक शाखेत दीड कोटी चोरण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती पण अनर्थ टळला आणि ते त्या रकमेपर्यंत पोहोचू शकले नाहीत.

अ‍ॅक्सिस बँकेच्या चेक्सबुक मधुन पाच पाने चोरुन त्यापैकी तीन चेक प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचे किमतीचे रक्कम लिहुन त्यावरही खोट्या स्वाक्षर्‍या करुन ते कॉसमॉस सहकारी बँक पुणे कॅम्प शाखा येथे डिस्प्रेड क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया ह्या नावाने खात्यात भरुन पास होण्यासाठी अ‍ॅक्सीस बँकेत सदर चेक पाठविले परंतु अ‍ॅक्सीस बँकेच्या सर्तकतेमुळे सदरचे चेक्स पास न होता बँकेतील रक्कम स्टॉप पेंमेट च्या आदेशाने वाचली. अन्यथा ह्या चोरट्यांनी जाधवराव यांच्या अ‍ॅक्सिस बँकेतील रक्कम उडवली असती. अ‍ॅक्सिस बँकेतील क्लार्कला संशय आल्याने त्यांनी जाधवराव यांना मोबाईल वरुन संपर्क साधला व विचारपुस केली असता चेक बनावट स्वाक्षरीचे असल्याचे सिद्ध झाले.

युवक व तरुणांना वर्तमानपत्रात प्रशिक्षण देवून त्यांना मोठे करण्याची जाधवराव यांचे स्वप्न आहे परंतु जाधवराव यांना युवा-तरुणांपासून अपेक्षित प्रत्यय अद्याप मिळालेले नाही. अर्थात राष्ट्रतेज मधुन अनेकांनी आपले करीअर ही घडवले आहे. तेही थोडे थोडके नाही. उमेश कदम बिबिषण काळे व नेहा वडके यांच्यावर दि. 23 जुलै 2019 रोजी विश्रामबाग वाडा येथे भा.द.वि कलम 406,408,420,465,467,471,468 व संगमनाताचा गुन्हा म्हणुन भा.द.वि. कलम 34 अन्वये गुन्हयाची नोंद करण्यात आलेली आहे. विश्रामबागवाडा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक या कामी तपास करत आहेत. या घटनेमुळे पत्रकारिता क्षेत्रात हाहाकार माजला आहे. उमेश तानाजी कदम व इतर दोघांची चौकशी चालू आहे.