बारामतीत भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

12

बारामती – बारामती विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान राष्ट्रवादी व भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने एकच गोंधळ उडाला शहरातील भिगवन चौकात ही परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांची गाडी देखील गर्दीत अडकली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या स्वागतासाठी सकाळपासूनच शहरातील भिगवण चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. 500 किलोंचा पुष्पहार बनवण्यात आला होता. मात्र पवार त्या मार्गावरून आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते नाराज होते. उमेदवारी अर्ज दाखल करून पवार इंदापूरकडे रवाना झाले. त्यानंतर भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या रॅलीला सुरुवात झाली. शहरातील भिगवण चौकात रॅली दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे व भाजपच्या कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या देखील फोडल्या. पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर रॅली रद्द करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय भवन येथे झाले. त्यांच्यासमवेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रंजन तावरे उपस्थित होते