वडगावशेरीत 7 उमेदवारांचे एकूण 10 अर्ज

195

पुणे – वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात गुरुवारी 7 उमेदवारांनी एकूण 10 अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. दुपारी 12.30 वाजता उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यालयात गर्दी होण्याला सुरुवात झाली होती.

भाजप-शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार जगदीश मुळीक, बहुजन समाज पक्षाकडून राजेश बेंगाळे, एमआयएम पक्षाकडून डॅनियल लांडगे, शिवसेनेकडून चंद्रकांत सावंत, “बळीराजा’ पक्षाकडून विठ्ठल गुल्हाने, तर शशिकांत राऊत आणि सविता औटी यांनी अपक्ष अर्ज भरला आहे.

भाजपचे माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी डमी उमेदवारी अर्ज भरला आहे. लांडगे यांनी 2, तर जगदीश मुळीक आणि योगेश मुळीक यांनी प्रत्येकी 2 अर्ज भरले आहेत. सावंत, राऊत, गुल्हाने आणि औटी यांनी प्रत्येकी 1 अर्ज दाखल केला आहे.

शिवसेनेकडून अर्ज भरलेल्या सावंत आणि बसपाकडून अर्ज केलेल्या बेंगाळे यांनी एबी फॉर्म जोडला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीव देशमुख यांनी दिली.