आचारसंहिता : 4 दिवसांत 1.36 कोटींची रोकड, 1.68 कोटींची दारू जप्त

12

मुंबई – विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागल्यानंतर गेल्या 4 दिवसांत आयकर, उत्पादन शुल्क व पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईत आतापर्यंत 3.79 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 1.36 कोटींची रोख रक्कम, 1.68 कोटींची दारू व 29 लाख रूपयांचे मादक पदार्थांचा समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

केंद्रिय निवडणूक आयोगाने 21 सप्टेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणूकीची घोषणा केली. तेव्हापासून महाराष्ट्रात आचारसंहिला लागू झाली आहे. गेल्या चार दिवसांत आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यंत्रणांनी केलेल्या कारवाईची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईत रोख रक्कम, दारू, मादक पदार्थांबरोबर 46 लाख किमतीचे मौल्यवान दागिनेही जप्त केले आहेत. तसेच 50 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मोदींचे बॅनर काढणार

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सरकारी, सार्वजनिक, खासगी ठिकाणी लावण्यात आलेल्या सरकारी व राजकिय पक्षांच्या जाहिरातीचे होर्डिग्ज, फलक काढण्याची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. आचारसंहितेनंतर राज्यातील पेट्रोलपंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातींचे बॅनर अजूनही काढले नसल्याबद्दल कॉंग्रेसने निवडणूक अधिकाछयांना पत्र दिले आहे, याबद्दल विचारले असता शिंदे म्हणाले, आचारसंहितेचा भंग करणाछया जाहिरातींचे बॅनर, फलक काढले जात आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाछयांना सतर्वै केले आहे. राज्यात आतापर्यंत शासकिय जागेवरील 75 हजार 981, सार्वजनिक ठिकाणी 73 हजार 445 व 16 हजार 428 खासगी ठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग्ज, बॅनर, कटआउट, झेंडे काढण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभेसाठी पांढरी व विधानसभेसाठी पिंग रंगाची स्लीप

राज्यात विधासभेबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही निवडणूकीसाठी 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन इव्हिएम व व्हीव्हीपॅटची दोन संच ठेवण्यात येणार असून मतदारांचा गोंधळ होऊ नये यासाठी लोकसभेसाठी असणाछया मतदान यंत्रावर पांढछया रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहे. तर विधानसभेसाठी असणाछया यंत्रावर गुलाबी रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहे. तसेच मतपत्रिकेचा रंगही याप्रमाणेच राहणार आहे. मात्र, विधानसभा व लोकसभेसाठी दोन वेगवेगळ्या मतदार स्लिप असणार आहेत.