लष्करी राज्याची परंपरा पाकिस्तानमध्ये प्रचलित

191

पाकिस्तानच्या आरोपावर भारताचे सडेतोड उत्तर

कंपाला : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान काश्‍मीरचा मुद्यावर चर्चा करण्याचे एकही व्यासपीठ सोडत नाही. संयुक्‍त राष्ट्रसभेनंतर पाकिस्तानने आता राष्ट्रमंडळ संसदीय परिषदेत काश्‍मिरी राग आळवला. मात्र तिथेही त्याला तोंडघशीच पडावे लागले आहे. पाकिस्तानने महासभेत भारताच्या लष्कराने काश्‍मीरवर काही दिवसांपुर्वी ताबा घेतला असल्याचा आरोप केला होता. मात्र पाकिस्तानचा हा आरोप खोडून काढत भारताने लष्करी राज्याची परंपरा ही पाकिस्तानची असल्याचे सांगत पाकला चोख प्रत्युत्तर दिले. युगांडाची राजधानी कंपाला येथे झालेल्या जनरल असेंब्लीमध्ये पाकिस्ताननेही काश्‍मिरबाबत भारतावर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला.पाकिस्तानकडून होत असलेल्या भारताच्या अपप्रचाराचा विरोध दर्शवित राष्ट्रमंडळ संसदीय परिषदेला पाकला चोख प्रत्युत्तर दिले.

लोकसभा सचिवालयाने दिलेल्या निवेदनानुसार, पाकिस्तानी संसदीय प्रतिनिधींनी महासभेत भारतीय सैन्याने काही दिवसापुर्वी काश्‍मीरवर कब्जा केला असल्याचा भारतावर गंभीर आरोप केला. मात्र भारतीय जनता पक्षाचे खासदार रूपा गांगुली यांनी पाकिस्तानच्या या खोट्या प्रचारावर त्वरित प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानमध्ये लष्करी राज्याची परंपरा प्रचलित आहे. इस्लामाबादमध्ये 33 वर्ष लष्करी राजवटी होती हे जगाने पाहिले आहे तसेच भारतात लष्करी राजवट कोणालाही माहिती नसल्याचे सांगत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय प्रतिनिधी मंडळ या परिषदेत पोहोचला. बिर्ला आणि गांगुली यांच्यासह अधीर रंजन चौधरी, एल हनुमाथैया, अपराजिता सारंगी आणि लोकसभेच्या सरचिटणीस स्नेहलता श्रीवास्तव यांचा देखील या प्रतिनिधी मंडळात सहभाग आहे.