अजित पवार लवकरच आपली भूमिका मांडतील – शरद पवार

11

मुंबई : राष्ट्रवादीचे नेता अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनाम दिल्याने राज्याच्या राजकारणा एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, आता त्यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी काळजीचे कोणतेही कारण नाही अजित पवार लवकरच तुम्हा सर्वांशी बोलतील असे म्हटले आहे.

अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पुण्यात गेलेल्या शरद पवारांनी तातडीने मुंबई गाठली आज दीड तास अजित पवारांसोबत बैठक पार पडली. यानंतर शरद पवार यांनी अजित पवारच तुमच्याशी बोलतील असे पत्रकारांना सांगितले. अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा का दिला? शरद पवारांनी त्यांची काय समजूत घातली? शरद पवार यांची शिष्टाई यशस्वी झाली का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळू शकणार आहेत. कारण अजित पवार काही वेळात पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडणार आहेत. शरद पवार यांनी सिल्वर ओक या ठिकाणी ही माहिती दिली. दुपारी साडेतीनच्या सुमारास यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत त्यामध्ये ते त्यांची भूमिका मांडतील