कॉंग्रेस कार्यकर्ते सदानंद शेट्टींच्या मुलाला मारहाण

17

कॉंग्रेस कार्यकर्ते सदानंद शेट्टींच्या मुलाला मारहाण
बारमध्ये आलेल्या ग्राहकांकडे बिल मागितल्याने झाला होता वाद
पुणे,दि.25- कॉंग्रेस कार्यकर्ते सदानंद शेट्टी यांच्या मुलासह चौघांना मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवार पेठेतील वसंत रेस्टॉरंट ऍन्ड बारमध्ये सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एकाला अटक केली असून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. एकूण आठ जणांविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कृष्णा आशिष मंडल(20,रा.कसबा पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर साक्षांत सदानंद शेट्टी(24), सुरक्षा रक्षक सनीदुल इस्लाम, एम.तिवारी आणी व्यवस्थापक विशाल केशव कुटे(28,रा.मंगळवार पेठ) यांना मारहाण करण्यात आली आहे.
फिर्यादी विशाल कुटे हे वसंत बारमध्ये व्यवस्थापक आहेत तर साक्षांत शेट्टी हा बारचा मालक आहे. सोमवारी रात्री आरोपी त्यांच्या बारमध्ये दारु पिण्यासाठी आले होते. दारु पिल्यानंतर त्यांना बिल देण्यात आले. मात्र बिल मागितल्याचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादीसह इतरांना शिवीगाळ करत लाथा-बुक्‍क्‍या व दगडाने मारहाण केली. यानंतर बार जाळूण टाकण्याची धमकी देत पळ काढला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जोरे करत आहेत.