सोसायटीच्या पार्किंगचा वाद ; महिलेस फरशीच्या तुकड्याने मारहाण

206

सोसायटीच्या पार्किंगचा वाद ; महिलेस फरशीच्या तुकड्याने मारहाण
पुणे,दि.25- सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी काढताना झालेल्या वादात एका महिलेला फरशीच्या तुकड्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये महिलेच्या तोंडाला, ओठाला आणी नाकाला जखम झाली. याप्रकरणी प्रणव रमेश येडे(30) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी विद्या दत्तात्रय लवांडे(37) असे जखमी महिलेचे नाव आहे. फिर्यादी व आरोपी एकाच सोसायटीमध्ये रहायला आहेत. फिर्यादीचे पती दत्तात्रय लवांडे हे त्यांच्या दुचाकी सोसायटीच्या पार्किगमधून बाहेर काढत होते. यावेळी त्यांनी आरोपीला बाजूला होण्यास सांगितले. मात्र आरोपीने फिर्यादीच्या पतीसोबत वाद घालत त्याला मारण्यासाठी फरशी घेऊन धाव अिाला. यावेळी फिर्यादी पतीला वाचवण्यासाठी आल्या असता त्यांना आरोपीने फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. यामध्ये ठिकठिकाणी मार लागून त्यांच्या नाकाचा पडदा तुटला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.