चांगल खेळता येत नसलं की … रोहित पवारांची भाजपवर खोचक टीका

240

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवर ईडीने गुन्हा दाखल केला, त्यामुळे एकीकडे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाच्या निषेधार्थ बारामती शहरात बंद पाळण्यात आला. ‘एकच वादा अजित दादा’, ‘एकच साहेब पवार साहेब’ अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. याच पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी भाजपवर फेसबुक पोस्टद्वारे जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय आहे रोहित पवारांची पोस्ट 

‘लहानपणी क्रिकेट खेळताना एखादा चांगल खेळत असेल तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा. माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा. तसच हे ED च प्रकरण चालू असल्याचा संशय येतो. चांगल खेळता येत नसलं की काहीही करून चिडायचं.
फक्त एक गोष्ट लक्षात असूदे आपला गडी लय भारी आहे.’