पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर सोनालीने थाटला दुसरा सुखी संसार

126

बऱ्याचदा लोकांना त्यांच्या जोडीदाराशी मिळतंजुळतं घेता येतच असं नाही. त्यामुळे त्यांना दुसरा विवाह ही करावा लागतो आणि मग ते यशस्वी ठरतातही. बऱ्याच मराठी कलाकारांच्या बाबतीतही काही असच घडलय. मराठीची सुपर स्टार एक्टरेस सोनाली कुलकर्णीच्या आयुष्यात हि असेच काही घडले. पहिल्या जोडीदारापासून विभक्त झाल्यानंतर तिनेदेखील दुसरा संसार थाटला.

सोनाली हि मूळची पुण्याची. सुरवातीला तिने गिरीश कर्नाड यांच्या ‘चेलुवी’ ह्या कन्नड चित्रपटापासून सिनेजगतात एंट्री केली. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटही केले. इतकेच नाही तर सोनाली कुलकर्णी यांनी सो कुल या पुस्तकाचे लेखन केले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीच पहिलं लग्न दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी झाल.

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी अनेक मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तसेच त्यांची नाटकेही खूप प्रसिद्ध आहेत. महेश एलकुंचवारलिखित `वाडा चिरेबंदी’, `मग्न तळ्याकाठी’ आणि `युगान्त’ या त्रिनाट्याचे ते दिग्दर्शक आहेत.

सोनाली कुलकर्णी आणि चंद्रकांत कुलकर्णी या दोघांचं एकमेकांत पटत नसल्याने त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २००७ साली दोघांचं डिवोर्स होऊन दोघे विभक्त झाले.

सोनाली कुलकर्णी यांचं २०१० साली नचिकेत पंतवैद्य यांच्याशी त्यांनी दुसरा विवाह केला. नचिकेत यांचेही हे दुसरे लग्न आहे. सध्या या दोघांना एक मुलगी आहे, तिचे नाव कावेरी.