मालेगाव शहरातील गणेश मंडळाचा देखावा आज खुला करणार

229

मालेगाव (घनश्याम अहिरे) : मालेगाव शहरात जवळपास 200 गणेश मंडळ आहेत. त्यापैकी बरेच मंडळ कोणार्क मंदिर, सुवर्ण मंदिर किल्ले व इतर देखावे सादर करतात. त्यासाठी कित्येक दिवस आधी देखावे तयार केले जातात व त्यासाठी खास कारागीर येतात. मंडळे नयनरम्य देखावे सादर करत असतात.

गणेशोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सर्व गणेश भक्तासाठी रात्रभर देखावे पाहण्यासाठी खुले होतील. मालेगाव शहर व परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात येण्यात असल्याची माहिती मिळत आहे. उद्या मात्र मिरवणुकीने गणपतीचे विसर्जन होईल.