इंडिया बिझनेस ॲन्ड इन्नोव्हेशन समिट सिंगापूर मध्ये ओरिसाच्या शिष्टमंडळाचा सहभाग 

21

भुवनेश्वर 10 सप्टेंबर 2019-   ओरिसाच्या उद्योग, एमएसएमई, उर्जा आणि गृह मंत्रालयाचे मंत्री कॅप्टन दिब्या शंकर मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिंगापूर येथील मरिना बे सँड्स एक्स्पो ॲन्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया सिंगापूर बिझनेस ॲन्ड  इन्नोव्हेशन  समिट मध्ये भाग घेतला होता. या शिष्टमंडळात डॉ. नितीन जावळे, आयएएस,एमडी इपीकॉल आणि उद्योग विभागाचे विशेष सचिव, अन्य सरकारी अधिकारी तसेच उद्योग जगतातील प्रतिनिधी म्हणून टाटा ग्रुप, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, हल्दिया पेट्रोकेमिकल्स चे प्रतिनिधी उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे आयोजन सिंगापूर मधील भारतीय उच्चायुक्तांनी केले होते.

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे मंत्री डॉ. एस जयशंकर, तसेच सिंगापूरच्या परराष्ट्र व्यवहार खात्याचे मंत्री डॉ. विवान बालकृष्णन हे यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

ओरिसाचे उद्योग मंत्री यांनी ओरिसा मध्ये गुंतवणूकीस मोठा वाव असल्याचे सांगितले आणि सिंगापूर मधील गुंतवणूकदारांना ओरिसा सारख्या उद्योगाला चालना देणार्‍या राज्यात गुंतवणूक करण्याची विनंती केली.

दुपारच्या सत्रात ओरिसा राज्यासाठी असलेल्या सत्रात डॉ. नितीन जावळे यांनी ’१०रिझन्स टू इन्व्हेस्ट इन ओरिसा’ या विषयावर एक सादरीकरण केले व यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कॉर्पोरेट्स चे मन मोहून टाकले.  टाटा ग्रुपच्या श्री अरूण मिश्रा आणि श्री प्रशांत मलिक यांनी गोलापुर इंडस्ट्रीयल पार्क आणि एसईझेड विषयीची माहिती दिली. त्याच बरोबर सरकार आणि आयपीकॉल यांनी कशा सेवा दिल्या याबद्दल माहिती सांगितली. या शिष्टमंडळाचा एक भाग असलेल्या आयओसीएल च्या डॉ. धनंजय श्रीवास्तव यांनी तसेच हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या सुभशेंदु चॅटर्जी यांनी ही यावेळी सादरीकरण केले.

त्याच बरोबर ओरिसा शिष्टमंडळाने सिंगापूर येथील ज्युराँग पेट्रोकेमिकल एरिया आणि अन्य स्टार्ट अप कंपन्यांनाही भेट दिली.