राजसी वाघ यांना ‘युवा नाट्यरत्न’ पुरस्कार

120

पुणे : नादम संस्थेतर्फे भारतीय शास्त्रीय नृत्याला प्रोत्साहन देण्यासाठी नुकताच दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात नृत्यार्थी कलाक्षेत्रमच्या नृत्य गुरू राजसी वाघ यांना ‘युवा नाट्यनृत्य’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जेष्ठ नृत्यगुरू जॉय राधाकृष्णन आणि विनिता शशीधरन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

या महोत्सवात एकल नृत्यप्रकारात देशभरातून 200 हुन अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. राजसी वाघ यांनी भरतनाट्यममधील शब्दम  हा नृत्यप्रकार सादर केला. रसिकांनी त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या महोत्सवात नृत्यार्थी कलाक्षेत्रमच्या आकांक्षा शहापुरकर यांनी तिल्लना, तर अनिता बोन्द्रे यांनी तोडेमंगलंम हे नृत्याविष्कार सादर केले. या दोन्ही नृत्याविष्काराना ‘नृत्यनाट्यप्रभा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

भारतीय शास्त्रीय नृत्यकलेचा आज जगभरात मोठया प्रमाणात स्वीकार केला गेला असून यामुळे शारीरिक व्यायामाबरोबरच व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते, असे मत विनिता शशिधरन यांनी व्यक्त केले.