टॅब्लेझने योयोसो हा आंतरराष्ट्रीय ब्रँड आणला भारतात

41

टॅब्लेझच्या वतीने अग्रगण्य ग्लोबल लाईफस्टाईल ब्रँड भारतातील अनेक ठिकाणी खुला होणार  

बेंगळूरू, 6 सप्टेंबर, 2019: टॅब्लेझ, या अग्रगण्य संघटीत रिटेल समूहाद्वारे बेंगळूरू येथील वेगा सिटी मॉल आणि आरएमझेड गॅलेरिया मॉल येथे 6 सप्टेंबर 2019 रोजी योयोसो या आंतरराष्ट्रीय लाईफस्टाईल ब्रँड चेनच्या दोन दालनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या दालनांचे उदघाटन टॅब्लेझचे व्यवस्थापकीय संचालक अदिब अहमद यांच्यासोबत योयोसोचे सह-संस्थापक आणि संचालक क्षी वेन लियांग यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. आगामी 3 वर्षांत 150 दालनांचे नेटवर्क विस्तारण्याची टॅब्लेझची योजना आहे.

या ब्रँड शुभारंभाप्रसंगी बोलताना टॅब्लेझचे व्यवस्थापकीय संचालक अदिब अहमद म्हणाले की, “योयोसोसमवेत हातमिळवणी करताना आम्ही फारच उत्साही आहोत. त्यामुळे एक लोकप्रिय आंतरराष्ट्रीय उत्पादन- शृंखला भारतात आणता आली. योयोसो हे एक साधे, फॅशनेबल आणि ट्रेंडी वन-स्टॉप डेस्टीनेशन असून त्याद्वारे आयुष्याच्या दैनंदिन गरजा पूर्ण केल्या जातात. आम्हाला विश्वास वाटतो की, यामुळे भारतीय ग्राहकांची चोखंदळ नस हेरली जाईल, त्यामुळे देशाला नानाविध आश्चर्ये आणि आनंद मिळेल.”

क्षी वेन लियांग हे योयोसोचे सह-संस्थापक आणि संचालक म्हणाले की, “भारत ही आशावादी भूमी असून ती एक फॅशन कंट्री आहे; टॅब्लेझसमवेत योयोसो हा ब्रँड भारतात आणण्याविषयी आम्ही आनंदी आहोत. बेंगळूरू येथे योयोसोच्या दोन दालनांचा शुभारंभ ही आमच्या धोरणात्मक सहकार्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल म्हणता येईल. मला आशा वाटते की, टॅब्लेझच्या संयुक्त प्रयत्नाने योयोसो हा नक्कीच भारताच्या रिटेल इंडस्ट्रीचा एक अग्रगण्य, उच्च गुणवत्तेचा ब्रँड म्हणून विकसीत होणार आहे.”

योयोसोची स्थापना मा हुआन यांनी 2014 मध्ये केली. आज ही एक आंतरराष्ट्रीय प्रसिध्द अशी लाईफस्टाईल ब्रँडची शृंखला आहे. हिचे मुख्यालय यीवू, चीन येथे असून तिचे कार्यान्वहन यीवू थिंक ट्रेडिंग को. लि. तर्फे चालते. या ब्रँडच्या वतीने किफायतशीर, फॅशनेबल आणि नियमित वापराची ट्रेंडी उत्पादने कार्यान्वहन, गुणवत्ता, डिझाईन आणि दर यांचा संगमासोबत उपलब्ध आहेत – हा ब्रँड शाश्वत विकासाचे तत्त्वज्ञान पाळतो.  आज 1000 हून अधिक योयोसो दालनांच्या माध्यमातून 36 देशांमधील 1 अब्जहून अधिक ग्राहकांना सेवा उपलब्ध करून दिली जाते.

टॅब्लेझने योयोसो समवेत हातमिळवणी करून भारतात ब्रँड दाखल केला आहे. येत्या पाच वर्षांमध्ये विविध ठिकाणी योयोसो दालने उघडण्याची योजना आहे. पहिल्या टप्प्यात 30 दालनांचा शुभारंभ करण्यात आला. योयोसोचा साधा, नैसर्गिक, उच्च-गुणवत्तापूर्ण आणि उत्तम किंमतीच्या उत्पादनाचे ध्येय भारतीय ग्राहकांची चोखंदळ नस हेरण्याचे, देशाला नानाविध आश्चर्ये आणि भारतातील नव्या पिढीला आनंद मिळवून देण्याचे आहे.

योयोसोमध्ये 5000 हून अधिक गुणवत्तायुक्त उत्पादने सर्वोत्तम मूल्य-कामगिरीसोबत आरोग्य आणि सौंदर्य, सर्जनशील गृह गरजा, हंगामी उत्पादने, डिजीटल साहित्य, स्टेशनरी आणि भेटवस्तू आणि फॅशन साहित्य अशा विविध वर्गवारीत उपलब्ध होतील. याउपर जर उत्पादनांविषयी अधिक बोलायचे झाल्यास किंमत, कार्यवहन आणि टिकाऊपणा हे प्रत्येक उत्पादनाचे मुख्य तत्त्व म्हणावे लागेल. त्यांची डिझाईन ही स्टाईल फॅशन घटकाची काळजी तर घेईलच शिवाय साधेपणा आणि मोकळेपणावर भर देणारी आहे. याद्वारे पारंपरिक कारागिरीचे संवर्धन तर होईलच, शिवाय सातत्यपूर्ण कल्पकता योयोसो’च्या उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांची किंमत राखायला साह्य करणारी आहे. ग्राहकांसाठी दर महिन्याला 500 नव्या उत्पादनांचा शुभारंभ होत असल्याने नवीन ट्रेंडची मजा घेता येते, परिणामी गुणवत्तापूर्ण जीवनमानाची हमी राहते.

 

योयोसोविषयी

योयोसो हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आधुनिक फॅशन आणि फुरसतीला समर्पित स्टोअर ब्रँड आहे. योयोसोद्वारे सौंदर्यप्रसाधन, गृह सजावटीच्या वस्तू, फॅशन असेसरीज, फॅशन बॅगा, डिजीटल असेसरीज, स्टेशनरी आणि भेटवस्तू, हंगामी उत्पादने, आयात करण्यात येणारे अन्नघटक इत्यादी 5000 प्रकारची गुणवत्तापूर्ण उत्पादने उपलब्ध करून देण्यात येतात. सध्या जगभरात 1000 हून अधिक दालने विस्तारली आहेत.

अधिक माहितीकरिता, कृपया भेट द्या: https://yoyoso.in/

टॅब्लेझबद्दल

टॅब्लेझ हा एक अग्रगण्य संघटीत रिटेल समूह असून याद्वारे भारतात एफअँडबी, खेळणी, लाईफस्टाईल आणि कपड्यांचे अग्रगण्य ग्लोबल ब्रँड सादर केले आहेत. या कंपनीने स्प्रिंगफिल्ड, विमेन’ज सिक्रेट, टॉईज’आर’यु’ज, बिल्ड-अ-बेअर, गो स्पोर्ट आणि योयोसो हे ब्रँड दाखल केले आहेत. एफअँडबी क्षेत्रात टॅब्लेझकडे कोल्ड स्टोन क्रिमेरी आणि गलिटोचे फ्रेंचायजी राईट आहेत. त्याशिवाय त्यांचा स्वत:चा ब्लूम्सबरी ब्रँड यशस्वीपणे विकसीत झाला आहे. सध्या टॅब्लेझची जगभर 70 हून अधिक दालने असून 2020 पर्यंत 300 दालने विस्तारण्याची योजना आहे.

अधिक माहितीकरिता, कृपया भेट द्या: http://www.tablez.com/