आंतरराष्ट्रीय ओव्हर डोस( घातक मात्रा) जागृती दिन संपन्न

44

पुणे : जगभरामध्ये अमली पदार्थ घातक मात्रेत घेतल्या मुळे मृत्यु पावलेले अथवा कायमस्वरूपी शरीरास इजा झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ ३१ ऑगस्ट हा दिवसी विविध कार्यक्रम साजरे केले जातात.

जान्हवी फौंडेशन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ विक्रम गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.जान्हवी फौंडेशन संस्थेच्या एच आय व्हि हस्तक्षेप लक्षगट शिरेव्दारे नाशा करणारा व्यक्ति समूह या प्रकल्पातील कर्मचारी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

आंतरराष्ट्रीय ओव्हर डोस( घातक मात्रा) दिनाचे औचित्य ,अमली पदार्थाची घातक मात्रा म्हणजे काय ?  घातक मात्रा कशी टाळावी ? घातक मात्रेत अमली पदार्थाचे सेवन केलेल्या व्यक्तीस उपचार कसे करावेत ? इत्यादिचे माहिती देण्यात आली.यामध्ये एकूण १२ शिरेव्दारे नाशा करणारया व्यक्ति सहभाग घेतला.यामध्ये पीर एज्युकेटर यानी सहभाग घेतला.

या कार्यक्रम महाराष्ट्र एड्स नियंत्रन संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री मनिष भोसले ,जान्हवी फौंडेशन प्रकल्प समन्वयक श्री शुभम भोसले, डॉ अशोक करमचंदनी, श्री जाधव, श्री सदाशिव कल्याणकर, श्री निलेश सोनवणे व वैशाली कुन्चेकर आदि उपस्थित होते.