पोलीस विभागाने पिंपरी चिंचवड येथील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे : गिरीश बापट

131

पुणे : सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून पिंपरी चिंचवड येथील  नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

पिंपरी-चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आज कार्यान्वित झाले. प्रारंभी याठिकाणी श्री. बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.

यावेळी श्री. बापट म्हणाले, पोलिसांनी लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांच्याशी समन्वय ठेवून काम करावे.तसेच लवकरच नव्या इमारतीमध्ये पोलीस आयुक्तालयाचे काम सुरु होईल, असेही ते म्हणाले.पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन म्हणाले, पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना योग्य सेवा देवून पोलीस विभाग चोख सेवा बजावेल.

यावेळी खासदार अमर साबळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त  श्रावण हर्डीकर, उपायुक्त विनायक ढाकणे, उपयुक्त स्मार्तना पाटील, उपायुक्त नमिता पाटील तसेच लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.