इम्रान खान अणुयुद्धाची धमकी देत होते तेव्हा PM मोदी होते पाकच्या हवाई हद्दीत!

209

नवी दिल्ली : पाकिस्तानी पंतप्रधान Imran Khan अणुयुद्धाची धमकी देत असतानाच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi थेट पाकिस्तानी एअर स्पेसमधूनच (Pakistan air space) भारतात परतत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची फ्रान्सच्या बियारित्झ शहरात G7 summit च्या निमित्ताने भेट झाली. काश्मीर प्रश्नात अमेरिकेने मध्यस्थीबद्दल उल्लेखही केला नाही आणि भारताची बाजू उचलून धरली. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने अप्रत्यक्षपणे अणुयुद्धाचीच धमकी दिली. जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने मोदी- ट्रंप यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये या दोन नेत्यांमध्ये चांगला संवाद झाल्याचं स्पष्ट झालं.

सोमवारी संध्याकाळी मोदी-ट्रंप यांच्या वार्तालापाची बातमी येत असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तान हे अण्वस्त्रधारी देश असल्याची जाणीव करून देणारं वक्तव्य केलं. जागतिक महासत्तेने पाकिस्तानची बाजू घेतली किंवा नाही तरी पाकिस्तान कुठल्याही थराला जायला तयार आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. पाकिस्तानी पंतप्रधान ही धमकी देत असतानाच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट पाकिस्तानी एअर स्पेसमधूनच भारतात परतत होते.

G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक मोठं विधान केलं. ‘जर वाद वाढला तर लक्षात ठेवा दोन्ही देशांकडे अण्वस्त्रं आहेत. अणुयुद्धात कोणीही विजेता नसतो आणि त्याचे परिणाम जागतिक असतात. महासत्तांची यात मोठी जबाबदारी आहे. त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा देवो अगर न देवो पाक कुठल्याही गोष्टींची तमा बाळगणार नाही’, असं इम्रान खान म्हणाले.

मोदींच्या परतीच्या प्रवासाआधीच इम्रान खान यांनी ही अणुयुद्धाची धमकी दिली होती. तरीही नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी एअरस्पेसमधूनच परतायचा निर्णय घेतला आणि पाकच्या अवकाशातून ते सहीसलामत भारतात परतले.

पाकिस्तानी एअरस्पेस मोदींसाठी खुली करून दिल्याबद्दल इम्रान खान यांना मात्र टीकेचे धनी व्हावे लागले. अनेक पाकिस्तानी ट्विटर यूजर्सनी खान यांच्यावर टीका केली.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी थेट अणुयुद्धाचीच धमकी अप्रत्यक्षपणे दिली. G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान Imran Khan इम्रान खान यांनी एक मोठं विधान केलं. फक्त भारताबद्दलच नाही तर जगातल्या महासत्तांनाही त्यांनी या विधानातून इशारा दिला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत आपण काश्मीरप्रश्न मांडणार आहोत, असंही इम्रान खान यांनी सांगितलं आहे. येत्या 27 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाची आमसभा होणार आहे. यामध्ये नरेंद्र मोदींच्या नंतर इम्रान खान यांचं भाषण होणार आहे.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 भारताने रद्द केलं, त्यानंतर पाकिस्तान हडबडला. प्रथम संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत पाकने चीनच्या मदतीने हा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला.पण हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं बहुतेक सर्व राष्ट्रांनी मान्य केल्याने पाकिस्तानचा प्रयत्न निष्फळ ठरला. आता इम्रान खान संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत काश्मीर मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तातडीने बैठक बोलवावी असा तगादा पाकिस्तानने त्यांचं मित्रराष्ट्र असलेल्या चीनच्या मदतीने लावून धरला होता.भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला, तो पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची बदनामी करण्याच्या उद्देशाने आणि भारताला अडचणीत आणण्यासाठी पाकिस्तानने पूर्ण प्रयत्न केले. पण त्यात या देशाला अपयश आलं.