रस्त्यात तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला; चेहरा, पाठीवर केले सपासप वार

160

रायगड : दिवसेंदिवस गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. गुन्ह्याचा असाच एक धक्कादायक प्रकार रायगडमध्ये घडला आहे. एका महाविद्यालयीन तरुणीवर चाकुने हल्ल्याची घटना रायगड जिल्ह्यातील पोलादपुरमध्ये घडली आहे. काही अज्ञातांनी तरुणीवर जोरदार हल्ला केल्यामुळे यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. भर रस्त्यामध्ये तरुणीवर अशा प्रकारे हल्ला झाल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.

अज्ञात हल्लेखोरांनी सदर तरुणीच्या हातावर, चेहरा आणि पाठीवर वार केले आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी पळून गेल्याची माहिती पोलिसांकडून देण्य़ात आली आहे. हल्ला होताच आरोपी फरार झाले तर स्थानिकांनी गंभीर जखमी अवस्थेत तरुणीला महाडच्या ग्रामिण रूग्णालयात उपचाराठी दाखल केलं. ही घटना मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपुर ग्रामीण रूग्णालयाशेजारी घडली आहे.

धारदार शस्त्राने शरीराच्या महत्त्वाच्य़ा अवयवांवर वार केल्यामुळे तरुणीनी रक्तबंबाळ झाली होती. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकाराविरोधात पोलादपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आता कसून तपास सुरू केला आहे.

तरुणीवर हल्ला करणाऱ्या अज्ञातांना शोधण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस स्थानिकांची चौकशी करणार आहेत तर परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीचा तपास करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी पोलीस पीडित तरुणीचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आपण सगळ्यात जास्त विश्वास ज्यांच्यावर ठेवतो अशा पालिसांनीच जर गुन्हा केला तर आपली सुरक्षा धोक्यात आहे. खाकी वर्दीला काळिमा फासणारं एक प्रकरण मुंबईत समोर आलं आहे. बँकेच्या बाथरूममध्ये महिलांचे कपडे बदलण्याचा व्हिडिओ शूट करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी असाच धक्कादायक प्रकार केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

बँकेच्या बाथरूममध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल महिलांचे कपडे बदलण्याचा व्हिडिओ शूट करत होता. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कॉन्टेबलला ताब्यात घेतलं. अनिकेत परब असं आरोपी पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. या सगळ्या प्रकरामुळे कर्मचारी महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे.