लीना जैन ‘सॅवी मिसेस इंडिया’ किताबची मानकरी

33

लीना जैन सॅवी मिसेस इंडियामध्ये ‘फिट अॅन्ड फॅब’  या किताबाच्या विजेत्या ठरल्या आहे . ही स्पर्धा नुकतीच पार पडली. लीना यांनी यापूर्वी २००१ मध्ये बेस्ट कॉन्सिलर्स, २०१० मध्ये मिसेस स्वामिनीचा किताब पटकाविला तर २०१८ मध्ये फेमिना मिसेस वायवेशीयेस स्टाईलिसटा हा किताबही त्यांनी पटकाविला होता.

या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की मिसेस इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी कुटुंबाची मोलाची साथ मिळाली. म्हणून हा किताब मी जिंकू शकले. त्या पुढे म्हणाल्या की मिसेस इंडियाचा ‘किताब पटकावल्यापासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून मला मॉडेलिंग व अभिनयासाठी बोलवणे होत आहे. लवकर मराठी किंवा बॉलिवूडमध्ये पदार्पण करेन.

त्यांच्या या यशासामुळे त्यांच्यावर सर्व स्थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचे मोलाचे योगदान राहिले असून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी सामाजिक कार्याची वसा जपला आहे. सध्या त्या सर्टिफाईड किड्स फिटनेस ट्रेनर असून लहान मुलांना तंदुरुस्तीसाठी त्या विशेष योगदान देत असून मुलांना घडवण्यासाठी त्यांचे काम समाजहिताचे आहे. यापुढे ही त्या हे काम असे अखंडपणे सुरु ठेवणार आहेत. असे त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.