पबजी मोबाइल लाइटचे भारतात अनावरण

223

महायशस्वी खेळाची वेगवान आणि हलकी आवृत्ती ४०० एमबीची आणि २ जीबी पेक्षा कमी रॅम असलेल्या मोबाइल उपकरणांसाठीही उपयुक्त

बंगळुरू, २५ जुलै २०१९ : पबजी मोबाइल या लोकप्रिय खेळाच्या वेगवान व हलक्या आवृत्तीचे अनावरण आज भारतात करण्यात आले. गूगल प्ले स्टोअरवर खेळण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी हा खेळ उपलब्ध आहे. पबजी मोबइलची गगनाला भिडणारी लोकप्रियता बघून अधिकाधिक उपकरणांवर खेळता येईल, अशा प्रकारे विकासकांनी पबजी मोबाइल लाइटची रचना केली आहे. कुठल्याही वेळी, कुठेही आणि कुठल्याही उपकरणावर खेळता यावा, ही यामागची संकल्पना असून या खेळाच्या सर्व फॅन्सना विनाअडथळा या खेळाचा आनंद लुटता यावा, यासाठी कमी क्षमतेचा रॅम असलेल्या स्वस्त श्रेणीतील स्मार्ट फोन्सवरही खेळता येण्याच्या दृष्टीने या खेळाची रचना करण्यात आली आहे.

अनरिअल इंजिन ४ सह या आवृत्तीची रचना करण्यात आली असून अधिकाधिक उपकरणांवर हा खेळ खेळणे शक्य होणार आहे. जगभरातील लक्षावधी चाहत्यांना आकर्षित करणाऱ्या या खेळाचा अनुभव घेताना कुठल्याही प्रकारची तडजोड करावी लागणार नाही, यासाठी कमी क्षमतेचा रॅम असलेल्या उपकरणांवरही तो खेळता यावा, अशा प्रकारे या खेळाची रचना करण्यात आली आहे. पबजी मोबाइल लाइटमध्ये ६० खेळाडूंसाठी लहान नकाशा असून त्यामुळे पारंपरिक पबजीची शैली कायम ठेवताना १० मिनिटांपर्यंत चालणारा वेगवान खेळ खेळण्याचा आनंद खेळाडूंना मिळेल. अवघ्या ४०० एमबीचा इन्स्टॉलेशन पॅक आणि २ जीबी रॅमपेक्षा कमी क्षमता असलेल्या उपकरणांवरही विनाअडथळा चालेल, अशा दृष्टीने केलेली खेळाची रचना यामुळे या आवृत्तीच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या खेळाडूंना खेळाचा आनंद लुटता येणार आहे. भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांपैकी ५० टक्के लोकांकडे प्राथमिक श्रेणीतले मोबाइल असतात, हे लक्षात घेऊन या लाइट आवृत्तीची रचना करण्यात आली आहे. या खेळात नव्याने सामील होणाऱ्या खेळाडूंना अनेक बक्षिसे मिळणार असून त्यात नवी साधने आणि नव्या वाहनांचा समावेश आहे.

पबजी मोबाइल लाइटची ठळक वैशिष्ट्ये :

• सुधारित नेम साह्य : अचूक नेम धरण्यासाठी नवीन साह्य वैशिष्ट्यांमुळे नेम धरणे सोपे झाले असून कमकुवत नेटवर्क असलेल्या ठिकाणी खेळ खेळण्यासाठी याची कमालीची मदत होते. रांगण्याच्या आणि उभे राहाण्याच्या स्थितीमध्ये असताना तीव्रतेत बदल होतो, त्यामुळे नियंत्रण सोपे होऊनही पबजी मोबाइलचा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव मात्र कायम राहातो.

• विनर पासपर्यंत बढती : रोयाल पासची जागा विनर पासने घेतली असून कामगिरी अनलॉक होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होईल. या पासचा कालावधी एक महिना असून अनेक आकर्षक बक्षिसे त्यात समाविष्ट आहेत.

• बुलेट ट्रेल अॅडजस्टमेंट : पबजी मोबाइल लाइटमध्ये बुलेटचा वेग अधिक असून बुलेट ड्रॉप इफेक्ट असणार नाही. कमी क्षमतेच्या नेटवर्कच्या ठिकाणी देखील अचूक बुलेट डागता यावी, हा यामागील उद्देश आहे.

• वेपन रिकॉइल सप्रेशन : पालन तंत्रामुळे वेपन रिकॉइलवर काही प्रमाणात दबाव येतो, ज्यामुळे गेम-कंट्रोल साध्य होते आणि कमी क्षमतेच्या नेटवर्कमध्येही विनाअडथळा खेळता येते. वेगवेगळ्या बंदुकांसाठी वेगवेगळे दबाव परिणाम असून त्यामुळे प्रत्येक शस्त्राच्या माध्यमातून वेगळा अनुभव मिळतो.

• बळी घेण्यासाठी वाढीव वेळ : या अपडेटमुळे बळी घेण्यासाठीचा वेळ देखील वाढणार असून त्यामुळे खेळाडूंना हातघाईच्या लढाईत अधिक वेळ टिकून राहाता येईल आणि आक्रमक खेळाला चालना मिळेल.

• लोकेशन डिस्प्ले : मिनी-मॅपच्या आवाक्यात असलेल्या नेमबाजाचे स्थान नकाशाच्या माध्यमातून समजून येईल, जेणेकरून लढाईची माहिती मिळणे सोपे होईल आणि लढाईची गती वाढेल

• आगेकूच करत असतानाच स्वतःवर उपचार करा : चेहरा खाली करून पोटावर झोपलेल्या अवस्थेत असताना वगळून अन्य सर्व परिस्थितीत खेळाडूंना स्वतःवर उपचार करता येतील. अधिक प्रलंबित वातावरणात, जिथे कुठल्याही प्रकारच्या हालचालीमुळे उपचारावर मर्यादा येतील, अशा परिस्थितीत हे वैशिष्ट्य उपयुक्त ठरेल. यामुळे खेळाचा वेग वाढेल आणि खेळाडूची टिकून राहाण्याची क्षमताही.

• इमारत परिसर/साधन सामग्री क्षमतावाढ : लहान आकाराच्या नकाशांना पूरक अशा प्रकारे इमारतींची घनता आणि लुटीची वारंवारिता वाढवण्यात आली असून यामुळे लुटीची प्रक्रिया गतिमान होईल आणि लढाईची प्रगती वाढेल

• नकाशाची दर्जावाढ : खेळाच्या या आवृत्तीत वाढीव दर्जाचा नकाशा असून पॅराशूट लोडिंग स्क्रीनही आहे.

• आरपीजी आणि नव्या शस्त्रांचा समावेश : लाइट आवृत्तीत खेळाडूंना काही ठराविक गेम मोड्समध्ये नव्या शस्त्रांच्या वापराचा अनुभव घेता येईल, तसेच आक्रमण आणि संरक्षणाचे नवे व्यूह रचण्याची संधीही मिळेल.