ही बातमी फक्त #TikTok वापरणार्‍यांसाठी

285

पुण्यात होणार टिकटॉकचा आंतरराष्ट्रीय शो : ब्लिंकथिंक मीडिया आणि पुणे प्रहारची आंतरराष्ट्रीय झेप : ‘शो’चे पोस्टर प्रदर्शित

पुणे (प्रतिनिधी) : लहान मुलांपासून ते वयोवृध्द माणसांपर्यंत सर्वजण टिकटॉकचा वापर करताना सध्या दिसून येत असतात. टिकटॉक म्हणजे जीव की प्राण असलेल्या तरूणाईंसाठी खास टिकटॉकचा आंतरराष्ट्रीय शो पुण्यात होणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक आणि ब्लिंकथिंक मीडियाचे संस्थापक अक्षय पंढरीनाथ माळी यांनी सांगितले.

‘शो’चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून यावेळी कार्यक्रमाचे आयोजक अक्षय पंढरीनाथ माळी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे पुणे शहराध्यक्ष कृष्णा के. देशमुख, पुणे प्रहारचे संपादक आणि महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रसिध्दी प्रमुख प्रतिक राम गंगणे, प्रियंका देविदास न्हाणे, निकिता उमेश आढाव, पूजा सतिश बैरागी, श्रध्दा रसाळ व राहुल घिके हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक अक्षय माळी म्हणाले, असा शो महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पहिल्यांदा होत आहे. एकाच दिवशी 1111 व्हिडिओचे स्क्रिनिंग करून त्यातील योग्य ते तीन विजेते निवडण्यात येतील. प्रथम येणार्‍या विजेत्याला सन्मानचिन्ह, सन्मापत्र आणि मराठी चित्रपटात काम करण्याची संधी तसेच दुसर्‍या आणि तिसर्‍या विजेत्याला लघुचित्रपटात काम करण्याची संधी आणि सन्मानपत्र देण्यात येईल.

प्रतिक गंगणे म्हणाले, टिकटॉक हे तरूणाईंच्या गळ्यातले ताईत बनले असून यात मराठी अभिनेते, अभिनेत्री तसेच टिकटॉवरून प्रकाशझोतात आलेले अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. आयोजकांची कल्पना आणि नियोजन यावर विश्वास असल्याने ह्या कार्यक्रमाला होकार दिला.

कसे व्हाल सहभागी?

♦ प्रत्येकी एकाने टिकटॉवरील चित्रफित केलेले तीन व्हिडिओ पाठविणे.

♦ त्यामध्ये कॉमेडी, इमोशनल, सिंगींग, डान्स, हॉरर, प्रॅन्क, असे व्हिडिओ असावेत.

♦ हे सर्व व्हिडिओ 9860064909 या नंबरवर व्हॉट्सअप करावेत.

♦ नाव नोंदणी करताना 1100/- रूपये फी भरून नाव नोंदणी करण्यात येईल.

♦ रक्कम जमा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील असेल. त्यासाठी 9860064909 या नंबरवर पेटीएम, फोन-पे, गुगल-पे, भीम अ‍ॅप यावर देखील तुम्ही रजिस्ट्रेशन फी जमा करू शकाल.

♦ फी जमा केल्यानंतर आपले पूर्ण नाव, पत्ता, आणि फी जमा केलेला स्क्रिनशॉट वरील व्हॉट्सअप नंबरवर पाठवावा.