झील कॉलेज मधील विद्यार्थ्यांना नामवंत कंपनीकडून १६ लाख पॅकेजची ऑफर

249

पुणे (प्रहार प्रतिनिधी) : झील अभियांत्रिकी महाविद्यालयाने चालू शैक्षणिक वर्षात प्लेसमेंटविभागात चमकदार कामगिरी केली आहे. महाविद्यालयाच्या २००+ विद्यार्थ्यांचे कॅम्पस सिलेक्शन झाले आहे. या पैकी २विद्यार्थ्यांना जपानच्या ओएस टेकनॉलॉजी मध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. वैभव जगताप आणि राहुल पॉल असे ह्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. दोघेही झील कॉलेज च्या मेकॅनिकल इंजिनीरिंग शाखेचे विद्यार्थी आहेत.

झील इन्स्टिटयूटने विद्यार्थ्यांसाठी ह्या वर्षी जपानी भाषेचे प्रशिक्षण चालू केले आहे.पहिल्याच वर्षात झीलच्या २ विद्यार्थ्यांना ओएस टेकनॉलॉजी कडून १६ लाखाचे पॅकेज मिळाले आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. अजित काटे, कार्यकारी संचालक श्री प्रदीप खांदवे आणि संस्थेचे सेक्रेटरी प्रा. जयेश काटकर यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विराज बर्गे आणि सर्व विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.